3 May 2024 11:10 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
My EPF Money | नोकरदारांनो! पगारातून EPF कापला जात असेल तर खात्यात 50,000 रुपये मिळतील, जबरदस्त फायदा Gratuity on Salary | पगारदारांनो! 35,000 रुपये पगार असणाऱ्यांना 1,41,346 रुपये ग्रॅच्युइटी मिळेल, अपडेट जाणून घ्या Post Office Scheme | फायदाच फायदा! दररोज फक्त 250 रुपयांची बचत करा, मिळेल 24 लाख रुपये परतावा 8th Pay Commission | खुशखबर! सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच 8'वा वेतन आयोग लागू होणार, पगारात किती वाढ होणार? Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 03 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rekha Jhunjhunwala | अल्पावधीत 1511% परतावा देणारा शेअर रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, डोळे झाकुन पैसे गुंतवा
x

राजकारणात धोका सहन करू नका असा मुंबईत संदेश देणाऱ्या अमित शहांना झारखंडमधील भाजप आमदारांनी धोका दिला, क्रोस वोटिंग केलं

Jharkhand BJP

Jharkhand Govt | केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज मुंबई दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधला मुंबई महापालिका निवडणुकीसाठी कानमंत्रही दिला. यावेळी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे यांनी धोका दिल्याचं म्हटलं. या धोक्याचा कसुर भरून काढायचाय असंही ते म्हणालेत. आपल्या सगळ्यांना माहितेय की उद्धव ठाकरे यांनी आपल्याला धोका दिलाय. राजकारणात काहीही सहन करा, धोका सहन करू नका, धोका देणाऱ्या गद्दारांना योग्य ती शिक्षा झालीच पाहिजे, असं अमित शाह यावेळी म्हणाले.

भाजप आमदारांकडून क्रॉस वोटिंग :
दुसरीकडे, झारखंडमध्ये सुरू असलेल्या राजकीय उलथापालथी दरम्यान, हेमंत सोरेन सरकारने आज एक दिवसीय विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावले. या अधिवेशनात सरकारने सभागृहात विश्वासदर्शक ठराव मांडला, त्यावर चर्चा झाली. पहिल्या आवाजी मतदानाने सरकारने सभागृहात बहुमत सिद्ध केले. यानंतर मतविभाजनाच्या माध्यमातून सरकारमध्ये ४८ तर विरोधी पक्षात शून्य मते पडली. सोरेन गटातील २ आमदार गंभीर सर्जरीमुळे इस्पितळात असल्याने ते येऊ शकले नाहीत तरी त्यांना अधिक मतं पडली आहेत. त्यामुळे भाजकडून क्रॉस वोटिंग झाल्याचं समोर आलंय.

विश्वासदर्शक ठरावावरील चर्चेदरम्यान मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले की, निवडणुका जिंकण्यासाठी दंगली भडकवून भाजप देशात “गृहयुद्ध” सारखी परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा हे झारखंडमधील आमदारांना फोडण्याचा सौदेबाजीचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. ज्या राज्यांत भाजपची सरकारे नाहीत, अशा राज्यांमध्ये लोकशाही मार्गाने निवडून आलेली सरकारे अस्थिर करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

आज त्यांना अशी परिस्थिती निर्माण करायची आहे की ते एका राज्याला दुसऱ्या राज्याशी लढायला लावण्यात गुंतले आहेत. त्यांना यादवी युद्धाची परिस्थिती निर्माण करायची आहे आणि दंगली करून निवडणुका जिंकायच्या आहेत, पण मी सांगू इच्छितो की, जोपर्यंत इथे युपीए सरकार आहे, तोपर्यंत अशा योजनेला हवा मिळणार नाही.

2024 मध्ये भाजपचा सुपडा साफ होणार :
हेमंत सोरेन म्हणाले, “2024 साठी आम्ही एक सर्व्हे केला आहे, ज्यामध्ये भाजपचा सफाया होणार अशी आकडेवारी समोर आली आहे, त्यामुळे ते सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहेत. आज आमचे तीन आमदार बंगाल आहेत, त्यांच्या घोडेबाजाराची जबाबदारी आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांच्यावर आहे. ते पोलिसांना तपासासाठी सहकार्य करत नाहीत.

२५ ऑगस्टपासून या राज्यात निवडणूक आयोग आणि राज्यपालांकडून असे वातावरण तयार केले जात आहे. निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे की, आम्ही आमचा इरादा राज्यपालांकडे पाठवला आहे. राज्यपाल शांत बसतात. राज्यपाल राजभवनाच्या मागच्या दारातून बाहेर आले असून दिल्लीत बसले आहेत. त्यांनी निवडणूक आयोगाचा सल्ला सरकारला कळविला पाहिजे. धमकावून आमदारांना धमक्या दिल्या जात असून, खरेदीचे प्रयत्न सुरू आहेत. सभागृहात आपण किती ताकदवान आहोत, हे पाहावं यासाठी हे अधिवेशन बोलावण्यात आलं आहे. ‘

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Jharkhand BJP MLAs cross voting in Trust vote check details 05 September 2022.

हॅशटॅग्स

#Jharkhand BJP(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x