27 September 2023 1:10 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ganesh Pandal Fire | पुण्यात गणेश मंडपाला आग, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि बावनकुळे देखील मंडपात उपस्थित होते GTL Infra Vs Sonu Infra Share | जीटीएल इन्फ्राला ऑर्डर मिळेना, पण सोनू इन्फ्राटेक कंपनीला रिलायन्ससह अनेक ऑर्डर्स, स्वस्त शेअर सुसाट तेजीत Zen Tech Share Price | मार्ग श्रीमंतीचा! झेन टेक्नॉलॉजी शेअरने अवघ्या 9 महिन्यात 317 टक्के परतावा दिला, भरवशाचा स्टॉक खरेदी करणार? Multibagger Stocks | एलटी फूड्स शेअरने अल्पावधीत 75 टक्के परतावा दिला, हा शेअर खरेदीसाठी ऑनलाईन गर्दी, कारण काय? Tata Power Share Price | पॉवर सेक्टर स्टॉकमध्ये जोरदार तेजी, विजेच्या वाढत्या मागणीचा फायदा टाटा पॉवर शेअरला होणार? Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 27 सप्टेंबर 2023 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! सणासुदीच्या दिवसात सोन्याचे भाव धडाम झाले, घसरण सुरूच, आज किती स्वस्त झाले सोन्याचे दर जाणून घ्या
x

पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये फडणवीसांच्या गृहखात्यावर देखील मुख्यमंत्री शिंदेंचा दबदबा? समर्थकांसाठी छुपं लॉबिंग?

Maharashtra Police

Maharashtra Police | राज्यात २८ उपआयुक्त आणि अधिक्षक दर्जाच्या एकूण २८ पोलीस अधिकाऱ्यांचा बदल्या करण्यात आल्या आहेत. यातील १३ जणांना मुंबईमध्ये पोस्टिंग मिळाली आहे. गृह विभागाने शनिवारी रात्री उशीरा याबाबतचे आदेश जारी केले. शिंदे-फडणवीस सरकारने मागील काही दिवसात प्रशासकीय आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरु केले आहे. नुकतेच काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्याही बदल्या करण्यात आल्या होत्या.

विशेष म्हणजे यामध्ये महाविकास आघाडी सरकारच्या काळात ज्यांना मुंबईबाहेरची साईड पोस्टिंग देण्यात आली होती, ज्यांच्यावर खंडणीचे गुन्हे दाखल करण्यात आले होते, त्यांनाही नियुक्ती देण्यात आली आहे. अकबर पठाण यांची बदली नाशिकमधून मुंबई परिमंडळ 3 या ठिकाणी करण्यात आली आहे.

परमबीर सिंग यांच्याशी कनेक्शन असणाऱ्या अधिकाऱ्यांना मलईदार पोस्टिंग?
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग हे पदावरून पायउतार झाल्यानंतर त्यांच्या विरोधात मुंबई आणि ठाण्यातील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात खंडणीचे गुन्हे दाखल झाले होते. त्या गुन्ह्यांमध्ये पोलिस उपायुक्त पराग मणेरे, अकबर पठाण आणि दीपक देवराज या अधिकाऱ्यांचीदेखील नावे होती.

मविआ सरकारने या तिन्ही अधिकाऱ्यांची मुंबई बाहेर साईड पोस्टिंग केली होती. तर मणेरे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. मात्र यापैकी एका गुन्ह्यात नाव आल्याने काही अधिकाऱ्यांवर अटकेची कारवाई करण्यात आली. त्यांना जेलची हवा खावी लागली. त्यानंतर मणेरे, पठाण आणि देवराज हे तिघे अधिकारी एकदम भूमिगत झाले.

महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार येताच या तिन्ही अधिकाऱ्यांच्या पंखांना पुन्हा बळ देण्यात आलं. रश्मी शुक्ला यांना क्लीनचीट दिल्यानंतर सरकारने त्यांच्यावर कारवाई करणं तर बाजूलाच राहिलं, उलट या अधिकाऱ्यांची मुंबईत बदली करून त्यांच्यावर कृपादृष्टी दाखविली अशीच चर्चा पोलिस वतुर्ळात रंगली आहे. यांच्यामुळे खालचे अधिकारी लटकल्याचं चित्र आहे. पण उपायुक्त दर्जाचे मणेरे, पठाण आणि देवराज यांना पुन्हा चांगल्या पोस्टिंगवर नियुक्ती करण्यात आली. हे म्हणजे एकप्रकारे खालच्या अधिकाऱ्यांवर अन्याय करण्यात आल्याचं बोललं जात आहे.

शिंदे गटाच्या आमदारचं लॉबिंग – गृहमंत्री अंधारात
परिमंडळ १० चे पोलीस उपायुक्त महेश्वर रेड्डी यांचा कार्यकाळ पूर्ण झाला असून त्यांच्या कार्यकाळात परिमंडळ १० मधील बऱ्याच अधिकाऱ्यांवर अँटी करप्शन विभागातर्फे कारवाई करण्यात येऊन देखील ते शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे यांचे निकटवर्तीय असल्याने दत्ता नलावडे (नार्कोटिक्स) मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्या बदल्या केल्या नसल्याची चर्चा पोलीस दलात सुरु झाली आहे. मात्र याबाबत फडणवीसांनी किती माहिती आहे याची देखील चर्चा सुरु झाली आहे. आपल्या समर्थक आमदाराला झुकतं माप देताना गृहमंत्री फडणवीस यांना मुख्यमंत्र्यांनी राजकीय धोबीपछाड दिल्याचं वृत्त आहे.

पोलीस उप आयुक्तांचे – विद्यमान पदस्थापना – बृहन्मुंबई अंतर्गत पोलीस आस्थापना मंडळाने दिलेली पदस्थापना
* कृषाकात उपाध्याय – परिमंडळ ६ – गुन्हे शाखा (प्रकटीकरण १)
* बालसिंग रजपूत – गुन्हे शाखा (प्रतिबंधक) – सायबर गुन्हे
* प्रशांत कदम – परिमंडळ ७ – गुन्हे शाखा प्रकटीकरण)
* राजू भुजबळ – गुन्हे शाखा – (अंमलबजावणी)- वाहतूक (पूर्व उपनगरे)
* विनायक ढाकणे – वाहतूक (पूर्व) – सशस्त्र पोलीस नायगांव
* हेमराज राजपूत – सशस्त्र पोलीस कोळे कल्याण कालिना – परिमंडळ-६
* संजय लाटकर – सुरक्षा – बंदर परिमंडळ
* डी. एस. स्वामी – परिमंडळ ८ – गुन्हे शाखा (अंमलबजावणी)
* प्रकाश जाधव – आर्थिक गुन्हे विभाग – अंमली पदार्थ विरोधी पक्ष
* संग्रामसिंह निशाणदार – गुन्हे शाखा (प्रकटीकरण) – आर्थिक गुन्हे विभाग
* विशाल ठाकूर – परिमंडळ ११ – अभियान
* प्रज्ञा जेडगे – वाहतूक (दक्षिण)- सशस्त्र पोलीस ताडदेव
* योगेशकुमार गुप्ता – परिमंडळ ३ – जलद प्रतिसाद पथक
* शाम घुगे – जलद प्रतिसाद पथक – सुरक्षा
* नितीन पवार – वाहतूक (पश्चिम उपनगरे) – सशस्त्र पोलीस कोळे कल्याण कालिना

पोलीस अधीक्षक/ पोलीस उप आयुक्तांचे नाव – विद्यमान पदस्थापना – बृहन्मुंबई अंतर्गत पोलीस आस्थापना मंडळाने दिलेली पदस्थापना
* अभिनव दिलीपराव देशमुख – पदस्थापनेच्या प्रतिक्षेत – परिमंडळ – २
* अनिल सुभाष पारसकर – उपायुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई – परिमंडळ- ९
* एम. रामकुमार – उपायुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई – मुख्यालय – १
* मनोज पाटील – पदस्थापनेच्या प्रतिक्षेत – परिमंडळ ५
* गौरव सिंग – पोलीस अधिक्षक, म.पो.अकॅडमी, नाशिक – वाहतूक (दक्षिण)
* तेजस्वी बा. सातपुते – पदस्थापनेच्या प्रतिक्षेत – मुख्यालय-२
* प्रविण मुंढे – पदस्थापनेच्या प्रतिक्षेत – परिमंडळ-४
* दिक्षीतकुमार गेडाम – पदस्थापनेच्या प्रतिक्षेत – परिमंडळ-८
* मंगेश शिंदे – समादेशक, रारापो बल गट क्र. २ पुणे – वाहतूक (पश्चिम उपनगरे)
* अजयकुमार बन्सल – पदस्थापनेच्या प्रतिक्षेत – परिमंडळ – ११
* मोहित कुमार गर्ग – पदस्थापनेच्या प्रतिक्षेत – गुन्हे शाखा (प्रतिबंधक)
* पुरुषोत्तम कराड – पोलीस उप आयुक्त, वाहतूक, नवी मुंबई – परिमंडळ-७
* अकबर पठाण – पोलीस अधीक्षक, ना.इ.स. नाशिक – परिमंडळ-३

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Maharashtra Police Department offers transfer GR check details on 13 November 2022.

हॅशटॅग्स

#Maharashtra Police(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x