7 August 2020 10:14 AM
अँप डाउनलोड

छत्रपती शिवाजी महाराज संबंधित 'फर्जंद' सिनेमाला मुंबईत प्राईम टाईम नाही - मनसे आक्रमक

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सेनेतले सुभेदार आणि तानाजी मालुसरेंचे शागीर्द सुभेदार कोंडाजी फर्जंद यांनी अवघ्या ६० मावळ्यांना सोबत घेऊन मिळवलेला पन्हाळा किल्ला आणि त्यांनी दाखवलेले शौर्य याची उत्तम कहाणी म्हणजे फर्जंद सिनेमा.

महाराष्ट्रनामा अँप डाउनलोड - कोविड - १९ डॅशबोर्ड

फर्जंद सिनेमा हा शुक्रवारी 1 जून रोजी महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित झाला. या सिनेमाचे सर्व शो सकाळी ११ ते दुपारी १.३० या वेळेत होत आहेत. या प्रकारामुळे नाराज झालेल्या ‘फर्जंद’ चित्रपटाच्या निर्मात्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांच्याकडे धाव घेतली. आणि या सिनेमाला मुंबईत एकही प्राईम टाईम शो न दिल्याने मनसेने याचा निषेध व्यक्त केला.

तरीही सिनेमाला तात्काळ प्राईम टाइम शो नाही दिले तर मनसे स्टाईलने आंदोलन करू असा इशारा वजा धमकी मनसे चित्रपट सेनेकडून देण्यात आली आहे.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Marathi(3)#MarathiCinema(4)MNS(92)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x