26 May 2022 11:26 PM
अँप डाउनलोड

शाहरुख खान चौथ्या अपत्याच्या तयारीत ?

मुंबई : होय ही अफवा नसून खुद्द शाहरुखने याचे संकेत दिले आहेत, मी माझ्या चौथ्या बाळाचं नाव आकांक्षा ठेवणार आहे असं खुद्द शाहरुख खानच म्हणाला. ‘टेड टॉक्स – इंडिया नयी सोच’ च्या शूटिंगच्या स्वतः शाहरुखने ही इच्छा व्यक्त केली.

शाहरुखला या आधीच ३ अपत्य असून त्यांची नावं अबराम, आर्यन आणि सुहाना अशी आहेत. नुकतीच त्याने चौथ्या बाळाची इच्छा व्यक्तं करून दाखवली आणि इतकंच नाही तर ती मुलगी असावी आणि तिचं नाव मी आकांक्षा ठेवणार आहे असं पुढे शाहरुख खान म्हणाला. आकांक्षा नाव उच्चारताना त्याला खूप टेक्स घ्यावे लागले असं पिंकवीला या बॉलिवूड वेबसाईटने नमूद केले आहे.

शाहरुख त्याच्या आगामी ‘झिरो’ चित्रपटाच्या शूटिंग मध्ये व्यस्त आहे.

हॅशटॅग्स

#Shashrukh Khan(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x