14 November 2019 12:00 AM
अँप डाउनलोड

सभे दरम्यान असदुद्दीन ओवेसींवर बूट भिरकावला

मुंबई : एमआयएमचे अध्यक्ष आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्यावर मुंबईत एका सभे दरम्यान बूट फेकून मारण्यात आला. मंगळवारी मुंबईतील नागपाडा भागात ही सभा चालू असताना हा प्रकार घडला.

सभेत असदुद्दीन ओवेसी तीन तलाक कायद्याबाबत बोलत होते आणि अचानक उपस्थितांमधील लोकांमधूनच असदुद्दीन ओवेसीच्या दिशेने बूट भिरकावण्यात आला. त्यामुळे काही क्षण गोंधळाची स्थिती निर्माण झाल्याने असदुद्दीन ओवेसीना थोडा वेळ भाषण थांबवावं लागलं.

नंतर बूट फेकण्याचे कृत्य करणार्यांबद्दल बोलताना असदुद्दीन ओवेसी म्हणाले की ही लोक महात्मा गांधी, गोविंद पानसरे आणि नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांचा विचारधारेची आहेत. पुढे ते असे ही म्हणाले की मुस्लिमांनी तलाकवर सरकारचा निर्णय स्वीकारला नाही, पण मी लोकहितासाठी लढणारा नेता आहे आणि असा द्वेष करणाऱ्या लोकांना मी घाबरत नाही. बूट फेकणाऱ्या व्यक्तीची ओळख पोलिसांना सीसीटीव्ही फुटेजद्वारे मिळाली आहे परंतु अजून अटक झालेली नाही.

हॅशटॅग्स

#Asaduddin Owaisi(2)#MIM(15)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या