15 December 2024 8:30 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | मल्टिबॅगर PSU एनएचपीसी शेअर रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: NHPC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - NSE: NBCC SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
x

महाराष्ट्र पोलिस दलात २४ तासांत १३३ जणांना कोरोना, दोघांचा मृत्यू

Covid 19, Corona Virus, Maharashtra Police, Mumbai Police

मुंबई, १९ जुलै : महाराष्ट्रात शनिवारी ८ हजार ३४८ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. तर १४४ कोरोनाबळींचा नोंद झाली. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता ३ लाख ९३७ इतकी झाली असून आतापर्यंत ११ हजार ५९६ जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. दरम्यान, राज्यात काल ५ हजार ३०६ रुग्ण बरे होऊन घरी गेले. त्यामुळे आतापर्यंत राज्यात १ लाख ६५ हजार ६६३ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

महाराष्ट्राची राजधानी मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. शनिवारी कोरोना रुग्णांच्या संख्येने एक लाखाचा टप्पा ओलांडल्याने प्रशासनाची डोकेदुखी आता प्रचंड वाढली आहे. मुंबईत शनिवारी १ हजार ११९ नव्या कोरोनाबाधितांची भर पडली, तर ६५ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे आता मुंबईतील एकूण कोरोना रुग्णांची संख्या १ लाख १७८ इतकी झाली आहे. तर दिवसभरात १ हजार १५३ जणांनी कोरोनावर मात केल्याने मुंबईत आतापर्यंत ७० हजार ४९२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

दरम्यान, लॉकडाऊनमध्ये गेल्या चार महिन्यांपासून पोलिस दिवस-रात्र आपलं कर्तव्य बजावत आहे. रस्त्यावर ड्युटी करत आहेत. त्यामुळे पोलिसांचा अनेकांशी संपर्क येत आहे. परिणामी कोरोनाबाधित पोलिसांचा संख्याही वाढत आहे.

राज्यात गेल्या २४ तासांत तब्बल १३३ पोलिस कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यात १९ पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तर 2 पोलिस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात १८४ कोरोनाबाधित पोलिस अधिकारी आणि १३०५ कर्मचाऱ्यांवर उपचार सुरु आहेत. आतापर्यंत राज्यात कोरोनामुळे ८७ पोलिसांचा मृत्यू झाला आहे. त्यात ७ पोलिस अधिकारी तर ८० पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

 

News English Summary: In the last 24 hours, 133 police corona positives have been detected in the state. It includes 19 police officers. Two policemen have died due to corona.

News English Title: In the last 24 hours 133 police corona positives have been detected in the state News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x