24 April 2024 7:06 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 24 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 24 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Communication Share Price | टाटा कम्युनिकेशन्स शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राईस जाहीर Waaree Renewables Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा शेअर! 6 महिन्यात 850% परतावा, तर 1 वर्षात 1250% परतावा दिला Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या कंपनीचा शेअर अप्पर सर्किट तोडतोय, वेळीच खरेदी करा Dynacons Share Price | कुबेर पावेल! हा शेअर खरेदी करा, 15 दिवसात दिला 83% परतावा, यापूर्वी 7657% परतावा दिला Voltas Share Price | टाटा तिथे नो घाटा! व्होल्टास शेअर्सची रेटिंग अपग्रेड, स्टॉक अल्पावधीत 38 टक्के परतावा देईल
x

केईएम रूग्णालय कोविड ICU कक्ष, नर्स-वॉर्डबॉय बराच वेळ गायब, रुग्णांचे प्रचंड हाल

KEM Hospital, Covid 19 ICU, Patient Missing

मुंबई, १ जून: केईएम रुग्णालयाती आणखी एक खळबळनजक प्रकार समोर आला आहे. केईएमच्या कोवीड अतिदक्षता विभागातील नर्स आणि वॉर्डबॉय तासोनतास गायब असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे अतिदक्षता विभागातील रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत.

यासंदर्भात एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हीडिओत तहानेने व्याकूळ झालेली एक महिला रुग्ण पाण्याची रिकामी बॉटल आपटताना दिसत आहे. मात्र, त्याठिकाणी नर्स किंवा वॉर्डबॉय हजर नसल्याचे दिसत आहे. अनेक नर्स आणि वॉर्डबॉय दांड्या मारत असल्याने केईएममध्ये कर्मचाऱ्यांचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे रुग्णांचे प्रचंड हाल सुरु आहेत. अखेर रुग्णांचे नातेवाईकच जीवाचा धोका पत्कारुन मदतीसाठी पुढे सरसावताना दिसत आहेत.

मुंबईतील केईएम रुग्णालयातून एक ७० वर्षीय रुग्ण हरवल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून भाजपचे माजी खासदार किरीट सोमैया यांनी याबाबत आवाज उठवत या प्रकाराला जबाबदार कोण ? असा सवाल केला आहे. सोमैया यांच्या म्हणण्यानुसार, मुंबईतील लालबागच्या जीजामाता नगरमध्ये राहणारे ७० वर्षांचे रुग्ण कोरोनासदृश लक्षणं असल्याने १४ मे रोजी रुग्णालयात दाखल झाले होते. १८ मे रोजी त्यांची अचानक तब्बेत खालावल्यामुळे त्यांना आयसीयुमध्ये दाखल करण्यात आले आणि व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. १९ मे रोजी सकाळी रुग्णालयातून रुग्ण हरवला असल्याचे नातेवाईकांना सांगण्यात आले. रुग्ण वॉर्डमधून हरवल्याचे नातेवाईकांना कळवण्यात आले.

त्यानंतर दोन दिवसांनी म्हणजे २१ मे रोजी एक मृतदेह दाखवत तो संबंधित रुग्णाचा असल्याचे सांगितले. पण तो आपल्या रुग्णाचा मृतदेह नसल्याचे नातेवाईकांनी सांगितले. त्यानंतर १० दिवस झाले तरी आजपर्यंत त्या रुग्णाचा शोध सुरु आहे. पण ते कुठे आहेत हे कुणालाच माहीत नाही, असे सोमैया यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

 

News English Summary: Another sensational type of KEM hospital has emerged. The nurse and wardboy Tasontas of KEM’s Kovid intensive care unit have been reported missing. As a result, patients in the intensive care unit are suffering.

News English Title: Corona covid 19 patient missing from Mumbai KEM hospital News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x