15 December 2024 11:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | मल्टिबॅगर PSU एनएचपीसी शेअर रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: NHPC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - NSE: NBCC SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
x

फडणवीसांना 'राजकीय' हिंदूह्रद्यसम्राट पदवी दिली, काही वेळात फडणवीसांचे बॉम्बस्फोटातील आरोपी याकूबच्या चुलतभावासोबत फोटो झळकले

Devendra Fadnavis

Yakub Memon Kabar | राज्यात हिंदुत्ववादी सरकार आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कडवट हिंदुत्ववादी आहेत. तर हिंदूह्रद्यसम्राट देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री आहेत. हे शिर्डीतील पोलीस अधिकाऱ्यांनी लक्षात ठेवावे असा इशारा भाजपा आमदार नितेश राणे यांनी दिला आहे. अपहरण, धर्मांतरण आणि लव्ह जिहाद प्रकरणी नगर जिल्ह्यात शिर्डीमध्ये नितेश राणे यांच्या नेतृत्वात जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता त्यावेळी त्यांनी राजकीय जोशमध्ये देवेंद्र फडणवीस हिंदूह्रद्यसम्राट असं म्हटलं आणि काही वेळात बॉम्बस्फोटातील आरोपी याकूबच्या चुलतभावासोबत गृहमंत्री फडणवीस यांचे फोटो व्हायरल झाल्याने आमदार नितेश राणे तोंडघशी पडले असून त्यांची समज माध्यमांवर खिल्ली उडवल्यात येतं आहे.

दक्षिण मुंबईतील मरीन लाइन्स स्थानकासमोर बडा कब्रीस्तान स्मशानभूमी आहे. या स्मशानभूमीतच मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमन याला दफन करण्यात आले. याकूब मेमनची कबर सजवण्यात आली आहे. कबर सजवण्यासा परवानगी कुणी दिली यावरुन आता चांगलाच वाद पेटला आहे.

कबर सजवण्याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. याकूबचा भाऊ टायगर मेमनच्या धमकीनंतर ही कबर सजवण्यात आल्याचा दावा बडा कब्रीस्तान ट्रस्टच्या एका माजी विश्वस्ताने केला आहे. याबाबत पोलिसात तक्रार केल्याचेही समजते. याकूबची कबर शहीदाच्या स्मारकाने सजवा असं म्हणत ही कबर सजवण्यासाठी जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप या विश्वस्ताने केला आहे. टायर मेमन सध्या फरार आहे.

एकाबाजूला शिवसेनेला घेरणारी भाजपाची नेते मंडळी आता स्वतःच या ट्रॅपमध्ये अडकल्याचं पाहायला मिळतंय. किशोरी पेडणेकर यांनी रऊफ मेमन आणि राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा एक फोटो ट्वीट केला आहे. आरोप करणाऱ्या भाजपच्या बारा तोंडांनी या फोटोला कॅप्शन द्यावे खोचक टोलाही त्यांनी लगावला आहे. तर, काँग्रेसने रऊफ मेमन आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा फोटो ट्वीट केला आहे.

किशोरी पेडणेकर यांनी देवेंद्र फडणवीस आणि रऊफ मेमन याचा फोटो ट्वीट केला. भारतीय जनता पार्टीच्या बारा तोंडाने दुसऱ्यावर आरोप करणाऱ्यांनी या फोटोवर कॅप्शन द्यावे असे टोलाही त्यांनी लगावला. किशोरी पेडणेकर यांनी ट्वीट केलेल्या फोटोत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हेदेखील दिसत आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Devendra Fadnavis is Hinduhriday Samrat said MLA Nitesh Rane check details 10 September 2022.

हॅशटॅग्स

#Nitesh Rane(100)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x