15 February 2025 1:56 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Money Alert | प्रायव्हेट नोकरदारांसाठी मोठी बातमी, रु.18000 सॅलरी असणाऱ्यांच्या खात्यात 1,30,35,058 रुपये जमा होणार Loan EMI Alert | कोणत्याही प्रकारचे कर्ज घेताना 'या' महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष द्या, नाहीतर पश्चातापाची वेळ येईल Horoscope Today | शनिवार, 12 राशींचे आजचे राशीभविष्य, मेष आणि तुळ सह या राशींसाठी शनिवारचा दिवस शुभ राहील Shukra Rashi Parivartan | शुक्र अस्त आणि उदय होणार, या 3 नशीबवान राशींच्या नशिबाचा उदय होणार, तुमची राशी कोणती New Income Tax Bill | सावधान, नवीन इन्कम टॅक्स बिलचा थेट तुमच्या आधार कार्ड आणि पॅन कार्डवर परिणाम होणार, अपडेट लक्षात ठेवा UPI ID | UPI वापरकर्त्यांनो इथे लक्ष द्या, 15 फेब्रुवारीपासून बदलणार महत्त्वाचा नियम, आता नवीन सुविधांचा लाभ घेता येणार Motilal Oswal Mutual Fund | शेअर्स नको, ही म्युच्युअल फंड योजना मल्टिबॅगर परतावा देईल, फायदा घ्या
x

कोरोना लढ्यात पोलिसांचं बलिदान; त्या पोलीस कुटुंबीयांना ५० लाख तर वारसाला सरकारी नोकरी

Covid 19, Corona Crisis

मुंबई, २६ एप्रिल:  कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झालेले हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत पेंदूरकर आणि संदीप सुर्वे यांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपये आणि त्यांच्या वारसांना सरकारी नोकरी देण्याची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विटरवरून यासंदर्भात माहिती दिली. त्यांनी कोरोनामुळे पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याबद्दल दु:ख व्यक्त केले. मात्र, सरकार या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांच्या पाठिशी ठामपणे उभे राहील, असे आश्वासन देशमुख यांनी दिले.

मुंबईत एका ५७ वर्षीय पोलीस कॉन्स्टेबलचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. संबंधित पोलीस मुंबईतील वाकोला पोलीस ठाण्यात कार्यरत होता. तर वरळी इथला रहिवासी होता. संंबंधित पोलिसाला कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्यावर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनाने पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे.

दरम्यान, मृत पोलीस कॉन्स्टेबलच्या मागे पत्नी, दोन मुलं आणि एक मुलगी असा परिवार आहे. दरम्यान महाराष्ट्रात आतापर्यंत ९६ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. ९६ पोलिसांत १५ अधिकाऱ्यांचा आणि ८१ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. गृहमंत्रालयातील अधिकाऱ्याने याबाबतची माहिती दिली होती.

 

News English Summary: The state government has announced Rs 50 lakh to the families of Head Constables Chandrakant Pendurkar and Sandeep Surve, who died due to corona virus, and to give government jobs to their heirs. State Home Minister Anil Deshmukh informed about this on Twitter. He expressed sorrow over the death of police personnel due to corona. However, Deshmukh assured that the government would stand firmly behind the families of these employees.

News English Title: Story Maharashtra government announce compensation to police employees died due to corona virus Covid 19 News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x