15 May 2021 11:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
आपला शत्रू एक बहुरूपी आहे, तो कपडे बदलून फोटो काढत असतो - सुरेंद्र राजपूत ऑक्सिजन गळती दुर्घटनेच्या १० दिवसांनी नाशिकमध्ये प्रकटलेले, पण चंद्रकांतदादा म्हणाले फडणवीस आणि मी.... कोणत्या फेक न्यूज फॉलो करते ही? | म्हणाली, समजलं की ते गंगा नदीतील नाही तर नाजयेरियातील फोटो राजकीय विरोधकांचा 'छळ' ही एकमेव 'टूलकिट' मोदी, शहा आणि आदित्यनाथ वापरतात - काँग्रेस राज्याला अधिक मदत द्या असं फडणवीसांकडून मोदींना एकही पत्र नाही, पण सोनिया गांधींना पत्र लिहिण्यास वेळ काढला फडणवीसजी सरकार लोकांचे जीव वाचविण्यात व्यस्त, तुम्ही भाजपची माशा मारण्याची स्पर्धा भरवत बसा - राष्ट्रवादी ज्याचं अग्नी दहन व्हायला हवं होतं, त्यांना दफन केलं जातंय, तुम्ही कसले हिंदू रक्षक - काँग्रेस
x

एक्झिट पोलनंतर विवेक'बुद्धी' हरवली; फ्लॉप कलाकार विवेक ओबेरॉयच वादग्रस्त ट्विट

Loksabha Election 2019

नवी दिल्ली : बॉलीवूडमध्ये सध्या संधी नसलेले अनेक कलाकार भाजप प्रेमी झाले आहेत. त्यानंतर त्यांचे वादग्रस्त प्रकार दिवसेंदिवस वाढू लागले आहेत. तसाच काहीसा प्रकार अभिनेता विवेक ओबेरॉय याने एक्झिट पोलवरून रंगलेल्या चर्चेवरून केला आहे. वास्तविक एक्झिट पोलबाबत काही मत व्यक्त करण्यास काहीस हरकत नव्हती. मात्र सध्या विवाहित असलेल्या ऐश्वर्या राय संदर्भात समाज माध्यमांवरील फिरणाऱ्या विचित्र गोष्टी शेअर करून त्याचा संदर्भ सध्याच्या एक्झिट पोलशी जोडणे म्हणजे निव्वळ स्वतःची विवेक’बुद्धी’ हरवल्याची प्रकार आहे असंच म्हणावं लागेल.

BhagyaVivah Marathi Matrimonial

थोडी अक्कल कमी असल्याने तो साहजिकच अगदी सहजपणे मोदी भक्त झाला आणि त्याची प्रचिती त्याने एका ट्विटमधून दिली आहे. सध्या तो भाजपाचा खंद समर्थक देखील आहे. अशात एक्झिट पोल प्रसिद्ध झाल्यानंतर त्याने शेअर केलेल्या एका मीममुळे त्याच्यावर जोरदार टीका होते आहे. विवेक ओबेरॉयने एक्झिट पोल कसे असतात? हे सांगण्यासाठी चक्क सलमान ऐश्वर्या प्रकरण उकरून काढले आहे.

एक्झिट पोल समोर आल्यापासून हे मीम व्हायरल होते आहे. हेच मीम विवेक ओबेरॉयने ट्विटरवर पोस्ट केले आहे. या मीममध्ये ३ फोटो आहेत. पहिल्या फोटोत ऐश्वर्या राय सलमान खानसोबत असलेला फोटो आहे त्याखाली ओपिनियन पोल असे लिहिले आहे. दुसऱ्या फोटोत विवेक ओबेरॉय आणि ऐश्वर्या राय असा फोटो आहे. त्या फोटोत एक्झिट पोल असे लिहिले आहे. त्यानंतर अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय आणि अराध्या यांचा फोटो आहे त्याफोटोखाली रिझल्ट असं लिहिलं आहे. हे मीम विवेक ओबेरॉयने तयार केलेले नाही. मात्र ते शेअर करत हे मीम आपल्याला खरोखरच आवडले अशी प्रतिक्रिया दिली आहे. ज्यानंतर त्याला ट्रोल व्हावे लागले आहे.

हे मीम पोस्ट केल्यानंतर नेटकऱ्यांच्या टीकेचा विवेक ओबेरॉयला सामना करावा लागला आहे. विवेक तुला काय झाले आहे? तुला असे करणे शोभते का? ऐश्वर्या रायच्या व्यक्तीगत आयुष्यावरून तू टीपण्णी का करतो आहेस ? हे आणि असे अनेक प्रश्न उपस्थित करत विवेक ओबेरॉयवर नेटकऱ्यांनी निशाणा साधला आहे. तर काही नेटकऱ्यांनी विवेक ओबेरॉयबाबत इतर मीम करत त्याचीही खिल्ली उडवली आहे.

हॅशटॅग्स

#Loksabha(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x