14 December 2024 5:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

भ्रष्ट अधिकारी वानखेडेंच्या परदेश वाऱ्या, महागडी घड्याळ आणि गाड्या, नवाब मलिक यांनी तेव्हाच रॉयल लाइफस्टाइलची अशी माहिती दिली होती

Aryan Khan case

Sameer Wankhede | बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्स प्रकरणी मोठा खुलासा समोर आला आहे. आर्यन खानला प्रकरणात मोठा खुलासा 18 कोटींची डील झाल्याचा खुलासा NCB व्हिजिलेन्सने केला आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे मुंबई झोनमधले माजी अधिकारी समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक करणं त्यांच्यासाठी अडचणीचं ठरत आहे. NCB व्हिजिलेन्सने 25 ऑक्टोबर 2021 ला या प्रकरणाचा तपास सुरू केला. आणि आता 11 मेला CBI कडे आपला अहवाल सादर केला.

आर्यन खान एनसीबीच्या आणि खास करून आरोपी आणि पंच असलेल्या किरण गोसावीच्या ताब्यात आहे, हे दाखवण्यासाठीच आर्यनचा ताबा के पी गोसावीला देण्यात आला होता. वानखेडे यांच्या आदेशानुसारच के पी गोसावी आर्यनला घेऊन एनसीबी कार्यालयात आला होता, असं सीबीआयच्या एफआयआरमध्ये नमदू करण्यात आलं आहे.

एनसीबीच्या कार्यपद्धतीच्या बाहेर असूनही एका पंचाला अशा कारवाईवेळी मुक्तपणे वावरण्याचे आणि एनसीबी कार्यालयात येण्याचे अधिकार वानखेडे यांनी दिले. आरोपी असलेले समीर वानखेडे आणि आशिष रंजन यांनी त्यांच्या घोषित केलेल्या मालमत्तेपेक्षा अधिक संपत्ती मिळवली.

समीर वानखेडे यांनी केलेल्या परदेश वारीचे म्हणावे तसे स्पष्टीकरण व्हिजिलन्स टीमच्या चौकशीत दिले नाही. महागडी घड्याळं आणि महागड्या गाड्या कुठून आल्या याचेही उत्तर देण्यात वानखेडे असमर्थ राहिले, असं सीबीआयने FIR मध्ये म्हटलं आहे. आर्यनचा मित्र अरबाज मर्चंट याच्याकडे जे चरस सापडलं ते सिद्धार्थ शाह या व्यक्तीकडून त्याने विकत घेतलं होतं. मात्र वानखेडे आणि इतर एनसीबी अधिकाऱ्यांनी या सिद्धार्थ शहा नावाच्या व्यक्तीला काहीही कारवाई न करता जाऊ दिलं, असा एनसीबीच्या दक्षता समितीचा अहवाल आहे. या क्रूझवर २७ लोक असताना फक्त १० जणांना ताब्यात घेण्यात आल्याचं सीबीआयने म्हटलं आहे. यामुळे समीर वानखेडे पुरते गोत्यात आले आहेत.

नवाब मलिक यांनी २ नोव्हेंबर २०२१ रोजी वानखडेंच्या लाइफस्टाइलबद्दल काय आरोप केले होते :

राज्याचे तत्कालीन अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्याकडून दररोज पत्रकार परिषदा घेऊन या प्रकरणात नवनवे खुलासे केले जात होते.

१. “ड्रग्ज प्रकरणात वसुली मालदीव येथे झाली होती. त्यांनी दुबई आणि मालदीव मधील दोघांचे फोटो टाकले होते. समीर वानखेडे मालदिवला आणि त्यांची बहिण दुबईमध्ये होत्या, असे नवाब मलिक यांनी म्हटले होते.

२. इतक्या लोकांना मालदीवला जाण्यासाठी २० ते ३० लाखांचा खर्च येतो. एनसीबीच्या दक्षता विभागाने याचा खर्च कोणत्या खात्यातून करण्यात आला याची चौकशी करायला हवी, असे नवाब मलिक म्हणाले होते.

३. समीर वानखेडे सत्तर हजारांचं शर्ट वापरतात, एक लाख रुपयांची पँट वापरतात आणि दोन लाख रुपयांचे शूज वापरतात, असा आरोप त्यांनी केला होता.

४. समीर वानखेडेंचे सर्व फोटो तुम्ही पाहा. त्यांचे बूट पाहा. louis vuitton चे बूट दोन-दोन, तीन-तीन लाखांचे आहेत, ते नेहमी बदलत असतात. त्यांचे शर्ट पाहाल तर त्यांची किंमत ५० हजारांपासून सुरु होते. टी शर्ट पाहिलं तर त्याची किंमत ३० हजार रुपयांपासून सुरु होते, असे मलिक म्हणाले होते.

५. वानखेडेंच्या हातातील घड्याळे दररोज बदलतात, ज्यांची किंमत २० हजारांपासून सुरु होते, ती एक कोटींपर्यंत किमतीची आहेत, असेही मलिक यांनी म्हटले होते.

६. एनसीबीच्या कोणत्याही अधिकाऱ्याचा शर्ट हजार-पाचशेपेक्षा महागडा नाही, पण समीर वानखेडेचा शर्ट ७० हजार रुपयांचा का असतो? प्रत्येक दिवशी नवे कपडे घालतात. मोदींच्याही पुढे गेलेत. पँट लाख रुपयांची, पट्टा २ लाखाचा, बुट अडीच लाखाचे, घड्याळ ५०, ३०, २५ लाख रुपयांचं. मी याचे सर्व फोटो तुम्हाला देईल, असेही मलिक म्हणाले होते आणि त्यांनी अनेक फोटो शेअर केले होते.

७. या सर्व काळात समीर वानखेडेंनी जशाप्रकारचे कपडे घातले आहेत त्याची किंमतच ५-१० कोटी रुपये आहे. काय प्रामाणिक अधिकारी १० कोटींचे कपडे घालत असतील का? असा सवाल नवाब मलिकांनी केला होता.

८. समीर वानखेडेंनी कोणतेही शर्ट पुन्हा घातलेले पाहिले नाही. दोन लाखांचे बुट घालणारा असा प्रामाणिक अधिकारी कोणी नसेल. आम्ही प्रार्थना करतो की देशातील सर्व प्रामाणिक अधिकाऱ्यांची अशाच प्रकारे प्रगती व्हावी. समीर वानखेडेंनी हजारो कोटींची वसूली केली आहे याची चौकशी व्हायला हवी, असे नवाब मलिक यांनी म्हटले होते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Bollywood super star Shahrukh Khan’s son Aryan Khan case disclosure of NCB vigilance Sameer Wankhede check details on 15 May 2023.

हॅशटॅग्स

#Aryan Khan case(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x