11 December 2024 12:54 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल IPO GMP | आला रे आला IPO आला, गुंतवणुकीची मोठी संधी, पहिल्याच दिवशी मिळेल मोठा परतावा - GMP IPO 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, जानेवारी 2025 मध्ये महागाई भत्ता इतका वाढणार, अपडेट आली Shukra Rashi Parivartan | डिसेंबरच्या 'या' तारखेपासून शुक्र गोचरमुळे काही राशींना भोगावे लागू शकतात गंभीर परिणाम NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर रॉकेट होणार, तेजीचे संकेत - NSE: NTPCGREEN BEL Share Price | डिफेंस शेअरमध्ये तेजीचे संकेत, मिळेल मोठा परतावा, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: BEL
x

Bigg Boss Marathi | अखेर ती आलीच,'ड्रामा क्वीन' राखी सावंतला पाहून निक्कीच्या चेहऱ्यावरचा उडाला रंग - Marathi News

Highlights:

  • Bigg Boss Marathi
  • बिग बॉसचा नवीन प्रोमो झाला वायरल :
  • आता खरं होणार प्रेक्षकांचं मनोरंजन :
Bigg Boss Marathi

Bigg Boss Marathi | बिग बॉस मराठीचा अंतिम टप्पा सुरू आहे. अशातच महाअंतिम सोहळ्याला फार कमी दिवस उरले आहेत. त्याचबरोबर यंदाच्या पर्वातील सर्वात बहुप्रतिक्षित भाग म्हणजे प्रत्येक सदस्याचे कुटुंबीय त्यांना भेटण्यासाठी आणि नवी स्फूर्ती देण्यासाठी आले होते. हा भाग संपताच बिग बॉस यांनी सर्व सदस्यांसाठी चिंग चायनीजचा एक अनोखा टास्क पूर्ण करण्यास दिला होता. टास्क छान पद्धतीने पार पडून कालचा भाग तिथेच संपला.

त्यानंतर सोशल मीडियावर बिग बॉस मराठीच्या आज होणाऱ्या भागाची जोरदार चर्चा होताना पाहायला मिळतेय. आता घरामध्ये एन्ट्री घेणार ठसकेदार, धडाकेबाज ड्रामा क्वीन. म्हणजेच आपली राखी सावंत. बिग बॉसच्या घरातील राखी सावंतच्या एंट्रीचा एक प्रोमो सोशल मीडियावर प्रचंड गाजला आहे. नेमकं काय आहे या प्रोमोमध्ये पाहूया.

बिग बॉसचा नवीन प्रोमो झाला वायरल :
प्रोमोमध्ये दाखवल्याप्रमाणे दरवाजा उघडतो आणि राखी सावंत नावाचं एक वादळ घरामध्ये शिरतं. राखीने घरात एन्ट्री घेतल्याबरोबर छोरी बडी ड्रामा क्वीन है, हे गाणं वाजतं. गाण्यावर थिरकत राखी म्हणते,” हॅलो बिग बॉस आय ॲम बॅक तुमची पहिली बायको”. असं राखी बिग बॉस यांना म्हणते. त्यानंतर लगेचच निक्कीवर कॅमेरा फिरवला जातो. तेव्हा निक्कीचा चेहरा खरंच पाहण्यालायक असतो. निक्कीच्या चेहऱ्यावर अक्षरशः बारा वाजलेले दिसतात आणि ती म्हणते,”अरे बाप”. पुढे राखी निक्कीला म्हणते की,”निक्की सस्ती राखी सावंत”.

त्यानंतर ती असं देखील म्हणते की,”आता घरात चालणार आहे माझा ठनाणानाणा..”. तिचा ड्रामा सुरू असताना घरातील इतर सदस्य फ्रीज असतात. परंतु प्रत्येकालाच हसू आवरेनास होतं. पुढे राखीचा आणखीन ड्रामा पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले आहेत. सर्वचजण रात्री नऊ वाजण्याची वाट पाहत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

आता खरं होणार प्रेक्षकांचं मनोरंजन :
राखी सावंत याआधी देखील हिंदीसह मराठी बिग बॉसमध्ये प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी आली होती. आता पुन्हा एकदा राखी प्रेक्षकांना खळखळून हसवायला आणि त्यांचं मनोरंजन करायला सज्ज झाली आहे. राखीच्या येण्याने बिग बॉसचा यंदाचा सीजन देखील उफाळून निघणार आहे. हिंदी बिग बॉसमध्ये राखी सावंत आणि निक्की या दोघींची भांडणं अजून देखील चर्चेत आहेत. आता या घरात राखी आणि निक्कीची जुगलबंदी पाहण्यास प्रेक्षकांना मज्जा येणार आहे.

Latest Marathi News | Bigg Boss Marathi Season 5 Rakhi Sawant Entry in BB House 28 September 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Bigg Boss Marathi(34)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x