5 December 2024 5:51 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Government Job | महाराष्ट्र कृषी विभागात सरकारी नोकरीची संधी, कसा कराल अर्ज, जाणून घ्या सविस्तर - Marathi News Earn Money Through Social Media | सोशल मीडियाच्या माध्यमातून करता येईल भरभरून कमाई; जाणून घ्या फायद्याची गोष्ट Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY NTPC Green Share Price | मालामाल करणार NTPC ग्रीन शेअर, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी - NSE: NTPCGREEN SIP Mutual Fund | ढीगभर पैसा जमा करायचा आहे मग, 'या' गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्या नाहीतर सगळंच गमावून बसाल Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
x

Singham Again Trailer | 'एक वचन के लिए वो लंका जलाने वाला है', 'सिंघम अगेन' मध्ये पाहायला मिळणार रामायणची झलक

Singham Again Trailer

Singham Again Trailer | सिनेविश्वात सर्वत्र एकच कल्लोळ होताना दिसत होता. तो म्हणजे सिंघम अगेनच्या ट्रेलरचा. अखेर सिंघम अगेनचा ट्रेलर लॉन्च झाला असून, केवळ 24 तासांमध्ये चित्रपटाने रेकॉर्ड ब्रेक केला आहे.

सिंघम अगेन या चित्रपटाने ट्रेलर रिलीजच्या 24 तासांत रेकॉर्ड ब्रेक केला आहे. केवळ 24 तासांत सर्वाधिक जास्त मिळणारा ट्रेलर सिंघम अगेन या चित्रपटाचा ठरला आहे. अजय देवगनचा तो जुना सिंघम लुक प्रेक्षकांना पुन्हा पाहायला मिळाला आहे. चित्रपटाचा ट्रेलर 7 ऑक्टोबर 2024 रोजी प्रदर्शित करण्यात आला असून फार कमी वेळात चित्रपटाने 138 मिलियन व्ह्यूजचा आकडा गाठला आहे.

‘सिंघम अगेन’ घडवणार इतिहास :
रोहित शेट्टी दिग्दर्शित सिंघम अगेन या चित्रपटाचा ट्रेलर चालू महिन्याच्या 7 तारखेला रिलीज झाला असून, अजयचा चाहतावर्ग 1 नोव्हेंबरची वाट पाहत आहेत. समस्त प्रेक्षक वर्गाला सिंघम अगेन हा चित्रपट जवळील चित्रपटगृहांत पाहता येणार आहे. ट्रेलर पाहूनच अनेकांना चित्रपट पाहण्याची उत्सुकता लागली आहे. दरम्यान सध्याच्या घडीला सिंघम अगेनने इतिहास घडवला आहे. आतापर्यंतचा सर्वाधिक मिलियन व्ह्यूज मिळणारा सिंघम अगेन चित्रपटाचा ट्रेलर ठरला आहे.

रोहित शेट्टीची खास पोस्ट :
सिंघम अगेनया चित्रपटाला रोहित शेट्टी याचे दिग्दर्शन लाभले आहे. त्याचबरोबर रोहितने सिंघम अगेनच्या ट्रेलर लॉन्चिंगचा एक पोस्टर त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला आहे. त्याने पोस्टला “तुमच्या सर्वांचे खूप खूप आभार. 1 नोव्हेंबरला भेटूया”. असं कॅप्शन लिहिलं आहे. रोहितच्या या पोस्टला अनेकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rohit Shetty (@itsrohitshetty)

सिंघम अगेनचा ट्रेलर देशभक्तीने समृद्ध :
ट्रेलर पाहून समजतंय की, चित्रपटामध्ये रामायणाची पुनरावृत्ती करण्यात आली आहे. यामध्ये रामायणच्या कथेप्रमाणेच सर्व सिनरी पाहायला मिळणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अजय देवगनची जबरदस्त डायलॉगबाजी पाहायला मिळणार आहे. ‘एक वचन के लिये वो लंका जलाने वाला है’ सिंघमच्या एका डायलॉगला चाहात्यांनी डोक्यावर धरलं आहे. चित्रपटाची थीम रामायणाची असून अभिनेता अजय देवगन रामाच्या भूमिकेत तर, अभिनेत्री करीना कपूर मॉडन सीतेच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर टायगर श्रॉफ लक्ष्मण, अक्षय कुमार जटायु आणि रणवीर सिंह बजरंगबलीला रिप्रेझेंट करणार आहे. त्याचबरोबर दीपिका पादुकोणही आपल्याला सिंघम लेडीच्या भूमिकेत दिसणार आहे. फुल ऑफ ॲक्शन आणि जबरदस्त फायटिंगसह प्रेक्षकांना एका नव्या ढंगात पुन्हा एकदा रामायणाची झलक सादर करण्यासाठी सिंघम अगेनची संपूर्ण टीम सज्ज झाली आहे.

Latest Marathi News | Singham Again Trailer 09 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Singham Again Trailer(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x