25 June 2022 2:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
निवडून येणारे शिंदेंसोबत | पण त्यांना निवडून आणणारे पदाधिकारी, कार्यकर्ते उद्धव ठाकरेंसोबत | पदाधिकाऱ्यांना राजकीय संधी Multibagger Stocks | या शेअरचे गुंतवणूकदार करोडपती झाले | 35519% रिटर्न | 50 हजाराचे 1 कोटी 78 लाख झाले शिंदेंकडून प्रॉपर्टीवर स्वतःच्या वडिलांच्या नावाचा वापर | पण पक्षासाठी 'बाळासाहेब ठाकरे' यांच्या नावाचा वापर होणार? भाजपच्या सांगण्यावरून शिंदेंचा समर्थक आमदारांनाविरुद्धही गेम प्लॅन | सेनेतच असल्याचं सांगून भीषण प्लॅन रचला आहे Maharashtra Political Crisis | शिंदे गटातील 10 बंडखोर आमदार पवारांच्या संपर्कात | गुवाहाटीत धाकधूक वाढली MPSC Recruitment Updates | एमपीएससी अभ्यासक्रम बदलणार | मुख्य परीक्षेत मोठे बदल होणार SBI Share Price | एसबीआय शेअर 673 रुपयांच्या पार जाणार | तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला
x

१५३ रुपयांत १०० टीव्ही चॅनेल दाखवाः दूरसंचार नियामक प्राधिकरण

नवी दिल्ली : TV वरील आवडीचे चॅनेल निवडण्यासाठी दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात ‘ट्राय’ ने ग्राहकांना ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे ग्राहकांचे हित लक्षात घेवून ट्रायने आज महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. त्यामुळे ग्राहकांना प्रति महिना १५३ रुपयांत १०० चॅनेल दाखवण्याचे थेट निर्देश ट्रायने केबल ऑपरेटर आणि डीटीएच’सेवा देणाऱ्यांना दिले आहेत. तसेच ग्राहकांनी TV वरील १०० चॅनेलची निवड ३१ जानेवारीपर्यंत करण्याच्या सूचना सुद्धा दिल्या आहेत.

पुढील महिन्याच्या सुरुवातीला म्हणजे १ फेब्रुवारीपासून सदर नियम अमलात येणार आहे. केबल ऑपरेटर आणि DTH सेवा पुरवठादारांनी ग्राहकांना प्रति महिना १५३.४० रुपयांप्रमाणे १०० चॅनेल दाखवावेत असे निर्देश देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे यात GSTचा सुद्धा समावेश करण्यात आला आहे. मात्र या शंभर चॅनेलमध्ये एकाही HD चॅनेलचा समावेश नसणार आहे. २ चॅनेलसोबत १ HD चॅनेल निवडता येवू शकतो, असे काही मीडिया एजन्सीने म्हटले होते. एका चॅनेलसाठी १९ रुपयांपेक्षा अधिक रक्कम मोजण्याचा आणखी एक निर्णय TRAI ने रद्द ठरवला आहे.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x