18 November 2019 12:26 AM
अँप डाउनलोड

अहो मोठा-भाऊ लहान-भाऊ नाही, ते प्रियकर-प्रेयसीचं भांडण आहे: प्रकाश आंबेडकर

मुंबई : शिवसेना आणि भाभारतीय जनता पक्ष यांच्यातील भांडण हे पती पत्नीचं नाही तर प्रियकर प्रेयसीचं यांच्यातील आहे अशी बोचणारी प्रतिक्रिया भारिपचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी युतीबाबत दिली आहे. नाशिकला बहुजन वंचित आघाडीची सभा पार पडली त्यावेळी उपस्थितांना संबोधित करताना शिवसेना आणि भाजपावर जोरदार टीकास्त्र सोडले.

तसेच भाषणात त्यांनी काँग्रेसवर सुद्धा सडकून टीका केली. MIM ला एकत्र घेणार असाल तर आम्ही तुमच्यासोबत नाही असे राष्ट्रीय काँग्रेस म्हटले होते. काँग्रेसला मुस्लिमांची मतं कशी काय चालतात? असाही प्रतिप्रश्न यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी भाषणादरम्यान बोलताना उपस्थित केला.

सध्याच्या घडामोडी पाहता सत्ताधारी शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांच्यामधून विस्तव सुद्धा जात नाही हे महाराष्ट्राने मागील ५ वर्षात अनेकदा अनुभवलं आहे. तरी सुद्धा हे दोन्ही पक्ष सत्तेत नांदत आहेत. राज्यात आम्ही मोठे भाऊ आणि भारतीय जनता पक्षाला लहान भाऊ अशी भूमिका शिवसेनेची आहे. परंतु, शिवसेनेच्या तुलनेत जास्त आमदार आल्याने भारतीय जनता पक्षाला ही भूमिका अजिबात मान्य नाही. आता मोठा भाऊ लहान भाऊ या नात्याऐवजी प्रकाश आंबेडकरांनी या दोन्ही पक्षांना थेट प्रियकर-प्रेयसीच म्हटले आहे.

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या