14 May 2021 2:49 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
91.6 टक्के परिणामकारक रशियन स्पुतनिक लसीची भारतातील प्रति डोस किंमत 995 रुपये तुमच्या तिथे चहात बिस्किटं बुडत असतील, आमच्याकडे चहातंच पूर्ण देश बुडाला - काँग्रेस प्रभू श्रीरामाच्या अयोध्येत ऑक्सिजन अभावी लोक मरत आहेत, पंतप्रधान, गृहमंत्री गायब - संजय राऊत कोरोना आपत्ती | जाहीर आकडेवारी पेक्षा भारत आणि मेक्सिकोमध्ये दुप्पट मृत्यू - अमेरिकन इंस्टीट्यूटचं विश्लेषण राज्य सरकारचं शिष्टमंडळाने राज्यपालांना भेटलं, पंतप्रधानांची वेळ मागणार असल्याचे जाहीर होताच.... मराठा आरक्षण | केंद्राकडून सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल PM किसान सम्मान निधी वाटप | पंतप्रधानांकडून प्रत्येक हप्त्याचा जाहीर LIVE इव्हेंट
x

मुंबई की लखनौ-पटना? सेनेकडून मुंबईत मकर-संक्रांत आधी 'भोजपुरी लाई चणा' कार्यक्रम

मुंबई: सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे जोरदार वाहू लागले असून शिवसेना राज्याच्या राजधानीत मराठी संस्कृतीपेक्षा उत्तर भारतीय संस्कृतीवर अधिक भर देताना दिसत आहे. याआधी सुद्धा शिवसेनेकडून मुंबई आणि ठाण्यात भव्य उत्तर भारतीय सन्मान मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. दरम्यान, या कार्यक्रमात अश्लील भोजपुरी कार्यक्रमांचे आयोजनसुद्धा मोठ्या प्रमाणावर करण्यात येत. मुंबई उपनगरात शिवसेनेने उत्तर भारतीय लोकांपुढे पूर्णपणे लोटांगण घातल्याचे चित्र अनेक महिन्यांपासून पाहायला मिळत आहेत.

BhagyaVivah Marathi Matrimonial

या भागात मराठी माणसाची डोकी उत्तर भारतीय घोळक्याने फोडली तरी शिवसेनेचे कार्यकर्ते त्याच मराठी माणसाची समाज माध्यमांवर टिंगल टवाळी करताना दिसतात हे राज्याच्या राजधानीतील मराठी माणसाचे दुर्दैव म्हणावे लागेल. शिवसेनेच्या या असल्या कार्यक्रमामुळे मुंबईउपनगरात मराठी संस्कृती भविष्यात हद्दपार होऊन, उत्तर भारतीय संस्कृती इथला ताबा घेईल असेच भविष्यातील चित्र बनत चालले आहे.

शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांना सुद्धा मराठी पेक्षा इथले उत्तर भारतीय लाडके झाले असून त्यांचं स्थान केवळ भाषणापुरतं मर्यादित राहिलं आहे. इथला मराठी शिवसैनिकांना याचं काहीच सुख दुःख नाही असं एकूण चित्र आहे. बांधकाम क्षेत्राने इथे मोठी भरारी घेतल्याने स्थानिक नेते मंडळी सुद्धा पुनर्वसनाच्या नावाने उत्तर भारतीय नेत्याच्या आणि मतदारांच्या अधीन गेले आहेत. भविष्यात इथले शिवसैनिक आणि मराठी युवक उत्तर भारतीय नेत्यांचे झेंडे खांद्यावर घेऊन मिरवताना दिसले नाही तर आश्चर्य वाटणार नाही असं इथलं एकूण चित्र होताना दिसत आहे.

हॅशटॅग्स

#Shivsena(1082)#udhav Thakarey(405)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x