3 December 2021 11:52 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jhunjhunwala Portfolio | झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओतील हा शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला | तुमच्याकडे आहे? Cryptocurrency Prices Today | क्रिप्टो मार्केटमध्ये सुधारणा | जाणून घ्या आजच्या क्रिप्टोकरन्सी किमती Stocks in Focus | 1 महिन्यात या 5 शेअर्समधून 13 ते 34 टक्क्यांपर्यंत रिटर्न | तुमच्या पोर्टफोलिओत आहेत? Stock Market LIVE | शेअर बाजारात तेजी | सेन्सेक्स 272 अंकांनी वाढला तर निफ्टी 17,473 च्या पुढे Stocks to Buy Today | आज हे ५ स्टॉक खरेदीचा ब्रोकरेजचा सल्ला | होल्डिंग टाईम १ आठवडा ATM Cash Withdrawal | ATM मधून पैसे काढणे महागणार | मर्यादेपेक्षा जास्त पैसे काढल्यास इतके शुल्क आकारणार Multibagger Stocks | या शेअर्सने 2000 ते 7200 टक्क्यांपर्यंत रिटर्न दिला | तुमच्या पोर्टफोलिओत आहेत?
x

माध्यमांच्या नावाने खोट्या बातम्या पसरवताना पकडला गेला राज्य भाजप IT सेल प्रमुख

मुंबई : महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाचा आयटी सेल प्रमुख आशिष मरखेड हा प्रसार माध्यमांच्या नावाने खोट्या बातम्या बनवून ते समाज माध्यमांवर पसरवताना पकडला गेला आहे. विशेष एबीपी न्यूज या वृत्तवाहिनीच्या ८ जानेवारीच्या राहुल गांधी याच्या मूळ बातमी मध्ये धार्मिक बदल करून ती स्वतःच्या अधिकृत ट्विटरवरून प्रसिद्ध करताना पकडला गेला आहे.

वास्तविक राहुल गांधी यांच्या मुलाखती विषयीची एक ब्रेकिंग न्यूज प्रसिद्ध करण्यात करण्यात आली होती. वास्तविक एबीपी न्यूजच्या त्या मूळ फ्लॅश न्यूजच्या स्क्रीनशॉटमध्ये फोटोशॉप करून त्यात राहुल गांधी जे बोलले नव्हते ते मुस्लिमांशी संबंधित वाक्य बनवून त्याला स्वतःच्या अधिकृत अकाऊंटवरून ट्विट केलं होतं.

भाजपच्या या फेक महाशयांनी या मूळ बातमीमध्ये फोटोशॉपकरून “काँग्रेस मुस्लिमो की है और उनकी ही रहेगी – राहुल गांधी” अस धार्मिक रूप देऊन हिंदुत्वाचा ठरल्याप्रमाणे अजेंडा राबविण्याचा कार्यक्रम आखल्याचे सिद्ध आहे. वास्तविक त्यात राहुल गांधी यांनी कोणताही धार्मिक विधान केलं नव्हतं. परंतु, हिंदू मुस्लिम असा द्वेष पसरवून समाजात विकृती पसरविणे हा त्यांचा एकमेव अजेन्डा असल्याचे सिद्ध होत आहे. विषय केवळ फोटोंचानसून तर अनेक व्हिडिओमध्ये सुद्धा खोडसाळपणा करून ते समाज माध्यमांच्या आधारे तरुण-तरुणींची माथी भडकविण्याचे कार्यक्रम राबवत असतात. त्यांच्या या कृत्यामुळे ते प्रसार माध्यमांची सुद्धा अप्रत्यक्ष बदनामी करत आहेत. बातमी खोटी असल्याचे निदर्शनास येताच नेटकऱ्यांनी त्याला चांगलेच फैलावर घेतले आहे.

हॅशटॅग्स

BJP(446)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x