20 April 2024 12:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | अवघ्या 63 पैसे ते 9 रुपये किमतीचे टॉप 10 पेनी शेअर्स श्रीमंत करतील, रोज अप्पर सर्किट हीट Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! तज्ज्ञांकडून इंडियन हॉटेल्स शेअर्सवर 'बाय' रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर Infosys Share Price | भरवशाचा इन्फोसिस शेअर उसळी घेणार, दिग्गज ब्रोकिंग तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राईस जाहीर Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची महिलांच्या फायद्याची खास योजना, अल्पावधीत मिळतील 2,32,044 रुपये Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना 'या' बँकेत FD वर बंपर परतावा, तब्बल 9.50 टक्क्यांपर्यंत व्याज मिळवा Gold Rate Today | बोंबला! आजही सोन्याचा भाव मजबूत उसळला, तुमच्या शहरातील कॅरेट प्रमाणे नवे दर तपासून घ्या Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार
x

आनंद दिघेंच्या हत्येचा कट बाळासाहेबांनी रचला होता; नंतर रुग्णालयात मृत्यू झाल्याचे भासवण्यात आले

रत्नागिरी : शिवसेनेचे ठाण्यातील दिवंगत नेते आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या हत्येचा कट रचण्यात आला होता. परंतु, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सांगण्यावरुन आणि आदेशाप्रमाणे त्यांचा रुग्णालयात मृत्यू झाल्याचे सामान्यांना भासवण्यात आले, असा धक्कादायक आणि अति गंभीर आरोप महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते, माजी खासदार आणि नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांनी केला आहे. तसेच हा प्रकार ज्या २ शिवसैनिकांना सहन न झाल्याने त्यांना देखील संपवण्याचे आदेश बाळासाहेबांनी दिल्याचा आरोप सुद्धा यावेळी निलेश राणे यांनी केला आहे. एका मुलाखती दरम्यान बोलताना त्यांनी हे आरोप केले आहेत.

दम्यान, मुलाखतीत आरोप करताना निलेश राणे म्हणाले, ‘नारायण राणे आणि आम्ही आजपर्यंत शिवसेनेविरोधात बोलताना नेहमीच एक मर्यादा पाळली होती. आम्ही याआधी बाळासाहेब ठाकरेंवर केव्हाही आरोप केले नव्हते. आमच्या राणेसाहेबांचं आज सुद्धा बाळासाहेबांवर प्रेम होतं, परंतु स्वतः ते कधीच व्यक्त करु शकले नाहीत. मी त्यांना राणे साहेब बोलत असलो तरी ते आधी माझे वडिल आहेत. त्यांचा जर जाहीर कार्यक्रमात कोणी अपमान करीत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही. अशा परिस्थितीत आम्हाला सुद्धा बाळासाहेबांची खरी परिस्थिती सगळ्यांना सांगावीच लागेल.

ठाण्यातील तसेच शिवसेनेतील वरिष्ठ नेते धर्मवीर आनंद दिघेंच्या हत्येचा कट रचल्याचे आणि त्यांचा मृत्यू इस्पितळात झाल्याचं भासवण्यात आलं होतं. मात्र हे २ शिवसैनिकांना अजिबात सहन झालं नाही, त्यामुळे त्यांचा देखील आवाज दाबण्यासाठी बाळासाहेब ठाकरेंनी कोणाला आदेश दिले. ही केस कशी काय दाबली गेली? असे अनेक सवाल करीत निलेश राणे यांनी गंभीर आरोप करत शिवसेनेला तोंडघशी पाडले आहे. तसेच मी स्वतः आजपर्यंत खूप मर्यादा ठेवल्या होत्या परंतु, जर राणेसाहेबांवर कोणी खालच्या पातळीचे माणून आणि खालच्या पातळीवर जाऊन टीका करीत असेल आपण हे सहन करणार नाही असे सुद्धा त्यांनी ठणकावले. कारण माझ्यासाठी राणेसाहेब महत्वाचे बाळासाहेब नव्हे. आम्ही आजवर मर्यादा पाळली, परंतु विनायक राऊतांनी व्यासपीठावर ती अजिबात पाळली नाही असे निलेश राणे म्हणाले.

तसेच बाळासाहेबांना बॉलीवूडचा प्रसिद्ध गायक सोनू निगमला देखील ठार करायचे होतं. तसे अनेक वेळा प्रयत्न सुद्धा झाले, हवं तर तुम्ही याबाबत त्यांनाच विचारा आज बाळासाहेब नाहीत तर ते खरं सांगतीलही. सोनू निगम आणि ठाकरे घराण्याचं नात काय? हे तुम्ही मला सांगायला लावू नका, अन्यथा हे सर्व मी जाहीर सभेत सांगेन. बाळासाहेबांच्या कर्जतच्या फार्महाऊसवर कोणा कोणाचे मृत्यू झाले हे सर्व जाहीरपणे सांगेन. त्यामुळे आमच्या नादी लागायचं नाही, आम्हाला राणे म्हणतात, अशा शब्दांत माजी खासदार निलेश राणे यांनी आरोप केले आहेत.

हॅशटॅग्स

#Nilesh Rane(65)#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x