27 July 2024 4:33 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gratuity on Salary | खुशखबर! 35 हजार पगार असणाऱ्या खाजगी नोकरदारांना ग्रॅच्युइटी इतकी रक्कम मिळणार Railway Ticket Booking | रेल्वे प्रवाशांनो! जनरल कोट्यातून लोअर बर्थ सीट मिळवता येईल, माहित असणं गरजेचं आहे EPF Pension Money | 90% पगारदारांना माहित नाही, EPFO कडून 7 प्रकारच्या पेन्शन मिळतात, फायद्याची अपडेट Lakshmi Narayan Rajyog | लक्ष्मी-नारायण योग 'या' 3 राशींसाठी ठरणार अत्यंत शुभ, आर्थिक नशीब उजळवणार FD Investment Money | 1 वर्षाच्या रु.1,50,000 FD वर कोण अधिक रक्कम देईल? SBI, पोस्ट ऑफिस, HDFC की ICICI? Gold Rate Today | खुशखबर! सोनं खरेदीची योग्य वेळ, आज सोनं 5149 रुपयांनी स्वस्त झालं, भाव धडाम झाले Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांच्या खात्यात दर महिना रु.20,050 येतील, महिना खर्चाची चिंता मिटेल
x

Deglur Biloli Bypoll | देगलूर-बिलोली पोटनिवडणूक | स्वबळाच्या बाता मारत भाजप शिवसेना नेत्याच्या भरोसे सज्ज

Deglur Biloli Bypoll

नांदेड , ०३ ऑक्टोबर | नांदेड जिल्ह्यातील देगलूर बिलोली विधानसभेची पोटनिवडणूक (Deglur Biloli Bypoll) होणार आहे. देगलूर विधानसभेसाठी 30 ऑक्टोबरला पोटनिवडणूक होणार आहे. भाजपनं देगलूर बिलोली जागेसाठी शिवसेनेतील नाराज नेते सुभाष साबणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. सुभाष साबणे शिवसेनेत नाराज होते, ते भाजपमध्ये प्रवेश करतील. काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे कोरोना संसर्गामुळे निधन झाले होते. त्यांच्या निधानानंतर ही जागा रिक्त होती. आता या जागेवर पोटनिवडणूक होणार आहे.

Deglur Biloli Bypoll will be held in Nanded district. The by-election for Deglaur Assembly will be held on October 30. BJP has announced the candidature of disgruntled Shiv Sena leader Subhash Sabne for Deglur Biloli seat :

देगलूरचे माझी आमदार सुभाष साबणे देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला नरसी नायगावमध्ये पोहचले होते. काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापुरकर यांच्या निधनानंतर या देगलूर बिलोली मतदारसंघात पोट निवडणूक होणार आहे. सुभाष साबणे लवकरच भाजपात प्रवेश करणार आहेत. देवेंद्र फडणवीस आणि सुभाष साबणे यांच्यात बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती आहे.

भाजप स्वबळावर लढेल:
येणाऱ्या काळात विधानसभेची मध्यावधी किंवा नियमित अशी कधीही निवडणूक झाली तरी स्वबळावर सर्व 288 जागा लढवून पूर्ण बहुमताने विजय मिळविण्यास भाजप सज्ज आहे, असा दावा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात केला होता. महाविकास आघाडीतील घटकपक्ष ज्या प्रकारे एकमेकाशी भांडत आहेत ते पाहता ही आघाडी पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल की नाही अशी शंका निर्माण होते, असा टीका पाटील यांनी लगावला होता.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Deglur Biloli Bypoll Shivsena leader Subhash Sabane will context election from BJP.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x