23 September 2021 5:52 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Municipal Corporation Elections 2022 | मुंबई वगळता इतर सर्व महापालिकांसाठी 3 सदस्यीय प्रभाग पद्धत संतापजनक | कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना फक्त ५० हजार रुपये भरपाई | केंद्राची सुप्रीम कोर्टात माहिती IPL 2021 | DC vs SRH | आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनराइज हैदराबाद सामना रंगणार Hybrid Flying Car | केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासमोर फ्लाइंग कारचे मॉडेल सादर राज्यपालांनी राज्याच्या हिताचा आणि ओबीसी समाजाच्या हिताचा निर्णय घेतला - फडणवीस उद्या सोमैय्यांचा पारनेर येथे 'आरोप पर्यटन दौरा' | कारखाना विक्री प्रकरणी सोमय्या पारनेरला जाणार Benefits of Fever | ताप येण्याचे शरीरासाठी असे '४' प्रकारचे फायदे - नक्की वाचा
x

दारुसाठी पैसे दिले नाही म्हणून जन्मदात्या आईचा खून करून काळीज काढणाऱ्या नराधमास फाशी

Kolhapur man sentenced to death

कोल्हापूर , ०९ जुलै | दारूसाठी पैसे दिले नाहीत या रागाच्या भरात जन्मदात्या आईला ठार मारून तिचे काळीज काढणाऱ्या निर्दयी नराधमास गुरुवारी कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. सुनील कुचकोरवी असे आरोपीचे नाव आहे. ही घटना कोल्हापुरात कावळा नाका परिसरातील माकडवाला वसाहतीत २८ ऑगस्ट २०१७ रोजी घडली होती. यल्लव्वा रामा कुचकोरवी असे मृत वृद्धेचे नाव होते. हल्लेखोर मुलगा सुनीलला याप्रकरणी कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायाधीश महेश जाधव यांनी फाशीची शिक्षा सुनावली. जन्मदात्या आईला क्रूरपणे मारणाऱ्या कुचकोरवी खटल्याच्या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते.

BhagyaVivah Marathi Matrimonial

गावोगावी फुगे, कंगवे विकून उदरनिर्वाह करणाऱ्या यल्लव्वा हिला दोन मुले. थोरला राजू तर धाकटा सुनील. दोघेही सेंट्रिंगचे कामे करतात. सुनीलला दारूचे प्रचंड व्यसन असल्याने त्या दिवशी दहाच्या सुमारास आई घरात आल्यावर सुनीलने तिच्याकडे पैशांची मागणी केली. यल्लवाने नकार दिल्याने या दोघांमध्ये वाद झाला. यानंतर घराबाहेर पडलेला सुनील एकच्या सुमारास नशेतच घरात आला. त्याने आईशी वाद घालत तिच्यावर धारदार चाकूने हल्ला केला. तिच्या मृतदेहाचे तुकडे केले.

दरम्यान, ही घटना कळताच पोलिसांनी नागिरकांच्या मदतीने हल्लेखोर सुनील याला ताब्यात घेतले, त्याचबरोबर चाकूही जप्त केला. याप्रकरणी १२ साक्षीदार तपासले. कोणताही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसताना परिस्थितीजन्य पुराव्यावरून न्यायालयाने सुनील याला दोषी ठरवले. याप्रकरणात सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील अॅड. विवेक शुक्ल यांनी काम पाहिले. त्यांना सहायक पोलीस उपनिरीक्षक एम. एम. नाईक यांनी मदत केली.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Kolhapur man sentenced to death for murdering mother news updates.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(266)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x