26 June 2024 1:13 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 26 जून 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी स्टॉक रेटिंग अपडेट, तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा, Hold करावा की Sell? RVNL Share Price | आता थांबणार नाही हा PSU शेअर, काय आहे अपडेट? यापूर्वी 2100% परतावा दिला Reliance Power Share Price | स्वस्त रिलायन्स पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, टेक्निकल चार्टवर मजबूत तेजीचे संकेत Suzlon Share Price | ICICI सिक्युरिटीजने सुझलॉन शेअर्स खरेदी सल्ला, शॉर्ट टर्म मध्ये मिळेल मोठा परतावा Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअरने धाकधूक वाढवली, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell? L&T Share Price | L&T सहित हे 5 मजबूत शेअर्स मालामाल करणार, मिळेल 34 टक्केपर्यंत परतावा
x

BMC Election 2023 | मुंबई कोस्टल रोड या आदित्य ठाकरेंच्या ड्रीम प्रोजेक्टचं 'नामकरणातून' क्रेडिट घेण्याचा शिंदे सरकारचा प्रयत्न? वास्तव जाणून घ्या

BMC Election 2023

BMC Election 2023 | छत्रपती संभाजी महाराज यांच्याकडून आपल्या सगळ्यांना प्रेरणा, एक आदर्श घेण्यासारखा आहे. त्यांचं बलिदान आहे हे कोणी विसरू शकणार नाही. त्यामुळे मुंबईच्या कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. काल मुंबईच्या गेट ऑफ इंडिया येथे छत्रपती संभाजी महाराज यांचा जयंती महोत्सव साजरा करण्यात आला.यानिमित्त मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.

दरम्यान, एकाबाजूला कर्नाटकात दारुण पराभव झाला असून दुसऱ्याबाजूला भाजपचा डोळा असलेल्या बिग बजेट मुंबई महानगपालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. मात्र २०१४ मध्ये मुंबईच्या समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा विशाल उभा करण्याचं आश्वासन मोदी-शहांनी दिलं होतं. त्यासाठी स्वतः पंतप्रधान मोदींनी दोन वेळा इव्हेन्ट सुद्धा केले होते. मात्र आज १० वर्ष उलटली तरी साधी एक वीटही रचता आलेली नाही. पंतप्रधान मोदींचं २०१६ मधील ट्विट पहा.

त्यामुळे आता मुंबईकर प्रश्न विचारातील म्हणून महाविकास आघाडी सरकारच्या काळात स्वतः तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी २०२० पासून लक्ष घातलेल्या कोस्टल रोडसारख्या ड्रीम प्रोजेक्टला नामकरणातून स्वतःच काम असल्याचा कांगावा करण्याची योजना आखल्याचे म्हटलं जातंय. शिवसेनेत फूट पडल्यापासून शिंदेंचं वर्ष कोर्ट कचेऱ्या, सभा-सोहळे यातच व्यस्त राहिल्याचं पाहायला मिळालंय. मग अशात विकास कामं होणार कुठून आणि त्यासाठीच महापुरुषांच्या नावाने पुन्हा इतरांच्या कामाचं क्रेडिट घेण्यास सुरुवात झाल्याचं राजकीय तज्ज्ञ सांगत आहेत. कारण, २०२० पासून जेव्हा हा प्रकल्प उभा राहत होता, तेव्हा एकनाथ शिंदे हे शिवसेना फोडण्याची योजना आखण्यात व्यस्त होते जे सध्याच्या घडामोडीतून स्पष्ट होतंय. मात्र यातील वास्तव काय आहे ते समजून घेऊया…

मुंबई शहरात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी मुंबईकरांना वाहतूक कोडींचा प्रचंड मोठा सामना करावा लागतो. उपनगरातून दक्षिण मुंबईपर्यंत जाण्यासाठी ३-४ तास अडकून राहावं लागतं. या वाहतूक कोडींतून मुंबईकरांची सुटका व्हावी मुंबई महापालिका कोस्टल रोडसारखा ड्रीम प्रोजेक्ट तयार करत आहे. या कोस्टल रोडचं काम प्रगतीपथावर असून पुढील २ वर्षात हा रस्ता सुरु होईल असा विश्वास तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी व्यक्त (8 डिसेंबर 2021) केला होता.

मुंबई कोस्टल रोड हा आदित्य ठाकरेंचा ड्रीम प्रोजेक्ट होता आणि त्यामुळे ते स्वतः या कामाच्या ठिकाणी वेळोवेळी लक्ष ठेवून आढावा घेत असे आणि त्यासंदर्भात समाज माध्यमांवर माहिती देतं असत. याबाबत आदित्य ठाकरे म्हणाले (8 डिसेंबर 2021 रोजी) होते की, डिसेंबर २०२३ पर्यंत कोस्टल रोड पूर्ण होईल. मेट्रो पूर्ण होईल, वरळी-शिवडी कनेक्शन दिसेल. मुंबईत येणारे शहरातील वाहतूक कोंडीला घाबरतात. मात्र ही कनेक्टिविटी सुरु झाली तर मुंबईत काम करण्यासाठी घाबरणारे लोक पुन्हा मुंबईत परततील असं त्यांनी सांगितले होते. त्यामुळे डिसेंबर २०२३ पासून मुंबईकरांची वाहतूक कोडींतून सुटका होण्याची शक्यता आहे.

आदित्य ठाकरेंच्या ड्रीम प्रोजेक्टमधील महापालिकेच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या मुंबई सागरी किनारा मार्ग (कोस्टल रोड) प्रकल्पाचे काम 2021 पासून वेगाने सुरू आहे. आतापर्यंत या प्रकल्पाचे ७० टक्क्याहून अधिक काम पूर्ण झाले आहे, तर मलबार हिल येथे समुद्राखालून जाणाऱ्या देशातील पहिल्या महाबोगद्याचे एक किलोमीटरपर्यंतचे काम जानेवारी 2022 मध्येच पूर्ण झाले होते. उर्वरित ९०० मीटरपर्यंतचे काम सुरू होते. स्वतः मुख्यमंत्री कार्यालयाने याबाबत 10 जानेवारी 2022 रोजी माहिती दिली होती.

बोगदे खोदण्यासाठी चीनमधून महाकाय टनेल बोअरिंग मशीन
प्रिन्सेस स्ट्रीट ते वरळी सी लिंकपर्यंतचा १०.५८ किलोमीटरचा कोस्टल रोड मुंबई महापालिकेच्या माध्यमातून बांधण्यात येत आहे. या मार्गात चार अधिक चार लेनसह भरणीवरील रस्ते, पूल, उन्नत रस्ते आणि बोगदे आहेत. हे बोगदे खोदण्यासाठी चीनमधून २,३०० टन वजनाचे महाकाय टनेल बोअरिंग मशीन २०२० मध्ये (उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना) मुंबईत आणण्यात आले होते. मलबार हिलच्या खालून हे बोगदे जाणार आहेत. या प्रकल्पाचा महत्त्वाचा भाग असणाऱ्या महाबोगद्याचे खोदकाम ११ जानेवारी २०२१ पासून सुरू करण्यात आले. टनेल बोरिंग मशीन या संयंत्राद्वारे हे काम सुरू होतं. त्यानुसार जमिनीच्या खाली १० ते ७० मीटर हे बोगदे असणार आहेत. प्रत्येक बोगद्याची लांबी २.०७ किलोमीटर असेल. यासाठी दररोज तीन सत्रांमध्ये काम सुरू होतं. मात्र शिंदेंनी शिवसेनेत फूट पाडली आणि हे काम रेंगाळले होते. शिंदे सरकारचं संपूर्ण वर्ष हे न्यायालयीन लढे, सभा आणि मिरवणुका यातच व्यस्त असल्याचं पाहायला मिळालं आहे. मात्र आता निवडणुका तोंडावर आल्यावर एखादा राजकीय इव्हेन्ट करता येतोय का याची संधी शोधत असल्याचं म्हटलं जातंय.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: BMC Election 2023 Shinde Govt taking Mumbai Costal Road Credit check details on 15 May 2023.

हॅशटॅग्स

#BMC Election 2023(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x