15 December 2024 5:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, कमाईची मोठी संधी Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची फायद्याची योजना, गुंतवा केवळ 50,000 आणि परतावा मिळेल 14 लाख रुपये
x

सर्व वाचकांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्या | लक्ष्मी देवीची कृपादृष्टी तुमच्यावर सदैव राहो

Happy Diwali 2020, Best wishes

मुंबई, १४ नोव्हेंबर: दिवाळी म्हणजेच दीपावली (Happy Diwali 2020) हा भारतामधील सणांचा राजा आहे. दीपावली या शब्दांतच त्याचा अर्थ दडला आहे. दीप म्हणजे दिवे आणि आवली म्हणजे ओळ. दिव्यांची रांग लावत सर्वत्र झगमगाट करणारा हा सण दीपोत्सव म्हणून धुमधडाक्यात साजरा केला जातो. महाराष्ट्रामध्ये अश्विन कृष्ण चतुर्दशी म्हणजेच नरक चतुर्दशीचा (Narak Chaturdashi) दिवस म्हणजे दिवाळीचा प्रमुख दिवस. यानंतर लक्ष्मी पूजन (Laxmi Pujan), दिवाळी पाडवा (Diwali Padwa) किंवा बलिप्रतिपदा (Bali Pratipada) आणि भाऊबीज (Bhaubeej) हे दिवस साजरे करून दीपावलीचं पर्व साजरं केलं जातं.

यंदा कोरोना वायरसचं मोठं आरोग्य संकट या दिवाळीच्या सणावर आहे. त्यामुळे यंदा दिवाळी अगदी जवळच्या व्यक्तींसोबत आणि साधेपणाने साजरी करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. मात्र दु:खाकडून आनंदाकडे, अंधाराकडून प्रकाशाकडे आणि नैराश्याकडून उत्साहाकडे घेऊन जाणारा सण ऑनलाईन माध्यमातून साजरा करून तुम्ही दिवाळीच्या शुभेच्छा (Happy Diwali) मित्रमंडळी, नातेवाईक आणि प्रियजनांना नक्कीच देऊ शकता.

दिवाळी कोविड 19 च्या फैलावाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक आणि गर्दी टाळत, सरकारने जारी केलेल्या नियमावलीचं पालन करत करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे प्रत्यक्षात गाठी भेटी घेणं, भेटवस्तूंची देवाणघेवाण टाळा आणि सोशल मीडियात व्हर्च्युअली एकत्र येऊन साजरी करत सार्‍यांना दिवाळीच्या शुभेच्छा द्यायला विसरू नका.

 

News English Summary: Happy Diwali 2020 is the king of festivals in India. Its meaning is hidden in the words Deepavali. Deep means lamps and avali means line. The festival is celebrated with great fanfare as Dipotsav. In Maharashtra, Ashwin Krishna Chaturdashi i.e. Narak Chaturdashi is the major day of Diwali. This is followed by Laxmi Pujan, Diwali Padwa or Bali Pratipada and Bhaubeej.

News English Title: Happy Diwali 2020 wishes news updates.

हॅशटॅग्स

#FestivalofUnity(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x