13 July 2020 8:15 AM
अँप डाउनलोड

शिवसेनेकडून आ. तानाजी सावंत यांना धडा शिकविण्याची तयारी; पक्ष शिस्तीचा संदेश देणार?

MLA Tajani Sawant, Shivsena

उस्मानाबाद: उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे आमदार माजी मंत्री तानाजी सावंत यांनी बंडखोरी करत भारतीय जनता पक्षाला मदत केली होती. मात्र सध्या शिवसेना त्यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेण्याची तयारी करत असल्याचं वृत्त आहे. शिवसेना पक्ष त्यांची थेट पक्षातून हकालपट्टी करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच पक्षविरोधी करवाई केल्याने सोलापूर शिवसेना जिल्हा सहसंपर्कप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील यांची देखील पदावरुन हकालपट्टी होण्याची शक्यता आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

त्यालाच अनुसरून सोलापूर आणि उस्मानाबादमधील शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबईतील निवास्थानी भेट घेणार आहेत. या भेटीमध्ये आमदार तानाजी सावंत यांची पक्षातून हकालपट्टी करण्याबाबत चर्चा आणि निर्णय होण्याची दाट शक्यता आहे. त्यांच्या भेटीत काय निर्णय होईल, याकडे कार्यकर्त्यांचे आणि प्रसार माध्यमांचे लक्ष लागलं आहे. त्यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवर संवाद झाल्यावर देखील तोच तोरा ठेवल्याने पदाधिकारी आणि कार्यकर्ते संतापल्याचे वृत्त आहे.

नुकत्याच झालेल्या राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये तानाजी सावंत यांचा ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला नव्हता. त्यामुळे ते प्रचंड नाराज होते. त्यानंतर त्यांचे उद्धव ठाकरे यांच्यासोबत खटकेही उडाले होते. उस्मानाबाद जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडीत शिवसेनेचे नेते डॉ. तानाजी सावंत यांनी महाविकास आघाडीऐवजी भारतीय जनता पक्षासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. तसेच शिवसेनेच्या एका बैठकीलाही ते अनुपस्थित राहिले होते. त्यामुळे सावंत यांच्याविरोधात पक्षामध्ये संतापाचे वातावरण आहे.

 

Web Title:  Shivsena is deciding to get aggressive against former Minister Tanaji Sawant.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Shivsena(891)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x