29 March 2024 5:36 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 30 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 30 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Adani Power Share Price | अदानी पॉवर आणि रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मोठा करार, शेअरमध्ये मजबूत वाढीचे संकेत Skipper Share Price | अल्पावधीत 510 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन धावपळ, नेमकं कारण काय REC Share Price | 1 वर्षात REC शेअरने 292% परतावा दिला, आता एका सकारात्मक बातमीने शेअर्स खरेदीला गर्दी Reliance Share Price | खुशखबर! भरवशाचा रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर देईल 55 टक्केपर्यंत परतावा, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत Reliance Power Share Price | शेअरची किंमत 28 रुपये, अवघ्या 15 दिवसांत 40% परतावा देणारा स्टॉक लवकरच मल्टिबॅगर?
x

फडणवीसांकडे २ तास मागितले असते तरी त्यांनी सरकारचे अनेक प्रश्न सोडवले असते

BJP Leader Chandrakant Patil, CM Uddhav Thackeray, Corona crisis

मुंबई, २ जुलै : तुमच्यात मतभेद आहे हे आम्ही बोलायचं नाही का? चौथीची मुलगीही सांगेल यांचं काही खरं नाही.. करोना संकटात देवेंद्र फडणवीसांकडे फक्त दोन तास मागितले असते तर त्यांनी दोन तासांमध्ये कितीतरी प्रश्न सोडवले असते. पण ही मदत घ्यायला यांचा इगो आडवा येतो आहे. असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरे यांच्यावर चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा या शब्दांमध्ये टीकास्त्र सोडलं आहे.

लॉकडाउन की अनलॉक अजून कळत नाही. मतभेद आणि गोंधळ संपत नाहीत. लॉकडाउनमध्ये जेवढे कडक निर्बंध नव्हते तेवढे अनलॉकमध्ये घालून ठेवले आहेत लोकांनी नेमकं काय करायचं? असाही प्रश्न चंद्रकांत पाटील यांन विचारला आहे. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत चंद्रकांत पाटील यांनी ही टीका केली आहे.

“मुख्यमंत्री किंवा सत्ताधाऱ्यांचा लोकांशी काहीच संबंध नाही. आम्ही सत्तेत असताना विरोधकांना तेव्हाही विचारात घेत होतो. एकट्या देवेंद्र फडणवीसांना जरी दिवसाचे दोन तास मागितले असते, तर त्यांनी कितीतरी प्रश्न सोडवले असते. पण ही मदत घ्यायला इगो आडवा येतोय”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

“सत्तेची हाव इतकी होती की या खुर्चीला किती काटे आहेत ते आत्ता त्यांना जाणवायला लागलं आहे. पंढरपूरला गेलो तरी आक्षेप, नाही गेलो तरी आक्षेप. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अंतर्गत वादाचा फटका शिवसेनेला बसत असला, तरी सत्तेपायी तो त्यांना चालेलच. सत्तेची हाव मोठी आहे”, असा घणाघात चंद्रकांत पाटलांनी केला.

 

News English Summary: If Devendra Fadnavis had been asked for only two hours in the Karona crisis, he would have solved many problems in two hours. But his ego is getting in the way of getting this help. That is what Chandrakant Patil has said.

News English Title: BJP Leader Chandrakant Patil Slams CM Uddhav Thackeray Government over corona crisis News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Chandrakant Patil(123)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x