29 March 2024 12:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | टेक्निकल चार्टवर NHPC शेअर कोणते संकेत देतोय, सकारात्मक उपडेटनंतर तज्ज्ञांनी काय सल्ला दिला? L&T Share Price | भरवशाचा L&T शेअर दैनिक चार्टवर ट्रेंड लाइन ब्रेकआउट देत आहे, तज्ज्ञांनी काय सल्ला दिला? Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स स्टॉकबाबत तज्ञ उत्साही, नवीन टार्गेट प्राइस जाहीर, किती परतावा मिळणार? Bonus Share News | सुवर्ण संधी! ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, वेळीच एन्ट्री घेऊन फायदा घेणार? IFCI Share Price | शेअरची किंमत 39 रुपये! IFCI शेअर चार्ट पॅटर्नमध्ये सकारात्मक वाढीचे संकेत, यापूर्वी 350% परतावा दिला Infosys Share Price | इन्फोसिस शेअरला या प्राईसवर मजबूत सपोर्ट, या पातळीवर टिकल्यास अल्पावधीत उच्चांक किंमत स्पर्श करणार Mutual Fund SIP | मार्ग श्रीमंतीचा! या 10 म्युच्युअल फंड SIP दरवर्षी 40% ते 71% परतावा देतं आहेत, सेव्ह करा यादी
x

खर्च पेंग्विनला पोसण्यासाठी की पेंग्विन गँगसाठी? | मनसेचा युवासेनेला पोश्टरबाजीतून टोला

Yuva sena

मुंबई, ०८ सप्टेंबर | ठाकरे सरकार आणि त्यांचं पेंग्विनप्रेम सध्या चांगलंच चर्चेत आहे. पेंग्विनच्या देखभालीसाठी काढण्यात आलेल्या निविदेला मात्र महाविकास आघाडीतला मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसनेच आता आक्षेप घेतला आहे. या पेंग्विनसाठी लागणाऱ्या खर्चाच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही ठाकरे सरकारवर चांगलीच टीका करत मुंबईत पोस्टरबाजी केली आहे.

खर्च पेंग्विनला पोसण्यासाठी की पेंग्विन गँगसाठी?, मनसेचा युवासेनेला पोश्टरबाजीतून टोला – MNS leader Santosh Dhuri criticized Yuva sena over Penguin issue in BMC :

आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात पोश्टरबाजी:
मनसेकडून मुंबईतल्या वरळीसह काही भागांमध्ये पोस्टर्स लावण्यात आली आहेत. या पोस्टरवर शिवसेनेला आणि महाविकास आघाडीला टोला लगावल्याचं दिसून येत आहे. हा खर्च पेंग्विनला पोसण्यासाठी की पेंग्विन गँगसाठी आहे असा टोलाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लगावला आहे.मनसैनिक संतोष धुरी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन हे पोस्टर शेअर केलं आहे.

काँग्रेसचाही आरोप:
भायखळा येथील वीर जिजाबाई भोसले उद्यानाच्या प्राणिसंग्रहालयातील पेंग्विनच्या देखभालीसाठी पालिकेने काढलेल्या निविदेला काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. पालिकेकडे स्वत:चे पशुवैद्यक असताना डॉक्टरांची नियुक्ती का केली जात आहे, असा प्रश्न काँग्रेस नेते रवी राजा यांनी उपस्थित के ला आहे. पालिकेने काढलेल्या १५ कोटी रुपयांच्या निविदा या उधळपट्टी असल्याचे काँग्रेस पक्षाने म्हटले आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: MNS leader Santosh Dhuri criticized Yuva sena over Penguin issue in BMC.

हॅशटॅग्स

#AadityaThackeray(40)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x