मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षावर बोचऱ्या भाषेत टीका केली आहे. दरम्यान, सत्तासंघर्षवर देखील उत्तर देताना उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे, ‘सत्ता कोणाला नको आहे? राजकारण करणार्या सगळ्यांनाच ती हवी आहे, पण २४ तास त्याच नशेत राहून झिंगणे आणि झिंगल्यासारखे तर्राट बोलणे हे बरे नाही’, असे सामनाच्या अग्रलेखात भाजपाला खडे बोल सुनावले आहेत.
राज्यातील ४८ पैकी ४३ जागा जिंकण्याचा ‘तोडगा’ भाजपच्या चाणक्यांकडे आहे. सामान्य जनता मरू द्या, राज्य खाक होऊ द्या, पण राजकारण टिकले पाहिजे. याला पाडू, त्याला पाडू असे सध्या सुरू आहे. याच धुंदीत उद्या हे स्वतःच कोसळतील, तरी देखील यांचा गिरे तो भी टांग उपर या पद्धतीने कारभार सुरूच राहील. थंडीने दवबिंदू गोठतात तसे राजकीय अतिसाराने सत्ताधार्यांची बुद्धी आणि मन गोठले असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
काय म्हटलं आहे आजच्या सामन्यात?
सत्ता कोणाला नको आहे? राजकारण करणार्यासगळ्यांनाच ती हवी आहे, पण चोवीस तास त्याचनशेत राहून झिंगणे व झिंगल्यासारखे तर्राट बोलणे हेबरे नाही. महाराष्ट्रात 48 पैकी 43 जागा जिंकण्याचा‘तोडगा’ यांच्यापाशी आहे. https://t.co/Wychz9oOw2
— Saamana (@Saamanaonline) February 11, 2019
