13 May 2021 8:50 AM
अँप डाउनलोड

उद्धव ठाकरेंचा अयोध्या दौरा हा आमच्या युतीसाठी पोषक : फडणवीस

मुंबई : शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे सहकुटुंब अयोध्येतील राम मंदिराच्या भेटीला गेले आहेत. दरम्यान, काल पासून ते अयोध्येच्या दौऱ्यावर असल्याने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या संबंधित प्रकरणावर प्रसार माध्यमांनी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी या दौऱ्याचे सर्मथन केले आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचा हिंदुत्व हा एकमेव उद्देश आहे आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंनी अयोध्या भेट घेणे हे उत्तमच असल्याची प्रतिक्रिया देऊन वेळ मारून नेल्याचे दिसले. तसेच अयोध्येत राम मंदिर उभारणे हा काही राजकारणाचा विषय नाही. त्यामुळे शिवसेना पक्ष प्रमुखांचा अयोध्या दौरा हा आमच्या युतीसाठी पोषक असल्याचे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना प्रभू रामाचे आशीर्वाद मिळतील असं सुद्धा सांगायला फडणवीस विसरले नाहीत. अयोध्येत राम मंदिर उभारणी झाली पाहिजे हे देशातील सर्व हिंदू बांधवांना वाटतं आहे. तसेच प्रभू श्रीराम हे अवघ्या देशाचे आराध्य दैवत आहे. त्यामुळे त्यांचे आशीर्वाद उद्धव ठाकरेंना नक्कीच लाभतील अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x