12 October 2024 2:45 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Login | पगारदारांनो, तुम्ही गरजेच्या वेळी EPF मधून पैसे काढता, नवा नियम लक्षात घ्या, होतं खूप मोठं नुकसान - Marathi News Post Office Scheme | महिलांनो पोस्टाच्या योजनेत पैसे गुंतवा आणि 32,000 रुपयांपर्यंत व्याज मिळवा, जाणून घ्या योजनेविषयी Post Office Interest Rate | पोस्ट ऑफीसची खास योजना, बचतीवर व्याजानेच कमवाल 2 लाख रुपये, फायदाच फायदा - Marathi News Credit Card | क्रेडिट कार्ड घेण्याआधी स्वतःला विचारा हे प्रश्न, नुकसान होणार नाही आणि मिळतील अनेक फायदे - Marathi News EPFO Passbook | पगारातून EPF चे पैसे कापले जातात, असा घ्या फायदा, EPF खात्यात जमा होतील 3 ते 5 करोड - Marathi News Shukra Rashi Parivartan | शुक्र राशी परिवर्तन, या 6 राशींच्या लोकांचा गोल्डन टाईम सुरु होतोय, तुमची राशी कोणती - Marathi News Gold Rate Today | बापरे, दसऱ्याच्या एक दिवस आधी सोन्याचे भाव वाढले, तुमच्या शहरातील आजचे नवे दर जाणून घ्या - Marathi News
x

शिवसेनेकडून मित्रपक्ष राष्ट्रवादीसाठी नमती भूमिका | राष्ट्रवादीला मोठ्या भावाचा मान

Shivsena, NCP, Ahmadnagar Municipal Corporation standing committee, MLA Sangram Jagtap, Marathi News ABP Maza

मुंबई, २५ सप्टेंबर : महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने एकत्र येऊन सरकार स्थापन केले. त्यानंतर आता स्थानिक निवडणुकीत वाद होऊ नये म्हणून नमती भूमिका घेत एकमेकांना मदत करत भाजपला बाजूला सारत आहे. अहमदनगर महापालिका निवडणुकीतही शिवसेनेकडे संख्याबळ असूनही राष्ट्रवादीला मोठ्या भावाचा मान दिला.

अहमदनगर महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी ऐनवेळेस भाजपातून राष्ट्रवादीत आलेले मनोज कोतकर यांची निवड झाली. समितीच्या अध्यक्ष स्थायी समिती सभापती निवडणूक लढविण्यास शिवसेना इच्छुक होती आणि राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असल्याने शिवसेनेचा या निवडणुकीत विजय निश्चित मानला जात होता. परंतु, शेवटच्या दिवशी मनोज कोतकर यांना आपल्या पक्षात घेऊन राष्ट्रवादीने आपल्या सहकारी पक्षाला एक जोरदार धक्का दिला.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी पत्र लिहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेला शब्द पाळला, असेही संग्राम जगताप यांनी म्हटले आहे. सभापतीपदाच्या निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांनी चर्चा केली होती. तसेच शिवसेनेचे मंत्री शंकरराव गडाख आणि राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनीही एकमेकांशी सल्लामसलत केली होती. या सगळ्यात शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडत दोन्ही पक्षांना एकत्र आणले होते.

आधी काय वाद होता?
जुलै महिन्यात पारनेर नगरपंचायतीमधील शिवसेनेच्या ५ नगरसेवकांनी दोन दिवसांपूर्वी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. पारनेरचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी हा प्रवेश घडवून आणण्यात पुढाकार घेतला होता. यात नंदा देशमाने, वैशाली औटी, नंदकुमार देशमुख, डॉ. सय्यद, किसन गंधाडे या नगरसेवकांचा समावेश होता.

यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रचंड दुखावले गेले होते. सत्तेत एकत्र असताना शिवसेनेला शह देण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न त्यांना पटला नव्हता. त्यामुळेच उद्धव यांनी मिलिंद नार्वेकर यांच्यामार्फत सर्व नगरसेवकांना शिवसेनेत परत पाठवा, असा खास निरोप अजित पवार यांना पाठवला होता. अखेर अजित पवार यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांच्याशी याबाबत चर्चा केली होती.

 

News English Summary: Manoj Kotkar, who came to NCP from BJP, was elected as the chairman of the standing committee of Ahmednagar Municipal Corporation. Shiv Sena was keen to contest the election of the Chairman of the Standing Committee and the victory of the Shiv Sena in this election was considered certain as the Mahavikas Aghadi was in power in the state. However, on the last day, the NCP gave a strong push to its ally by taking Manoj Kotkar to its side.

News English Title: Shivsena and NCP contest Ahmadnagar Municipal Corporation standing committee election together Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x