14 May 2021 5:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
निकालापासून फडणवीसांकडून ना राज्यपालांची भेट, ना पंतप्रधानांची, ना राष्ट्रपतींची... पण दिली ही रोजची प्रतिक्रिया गुजरातमध्ये कोरोना मृतांच्या आकड्यांची खोटी माहिती? 1.23 लाख मृत्यूचे दाखले वितरित अन कोरोनाने मृत्यूचा आकडा 4218 दिल्लीकरांसाठी देवदूत ठरलेल्या बी श्रीनिवास यांच्याविरोधात क्राईम ब्रांच फेरा | मोदी सरकारविरोधात काँग्रेसचा संताप 91.6 टक्के परिणामकारक रशियन स्पुतनिक लसीची भारतातील प्रति डोस किंमत 995 रुपये तुमच्या तिथे चहात बिस्किटं बुडत असतील, आमच्याकडे चहातंच पूर्ण देश बुडाला - काँग्रेस प्रभू श्रीरामाच्या अयोध्येत ऑक्सिजन अभावी लोक मरत आहेत, पंतप्रधान, गृहमंत्री गायब - संजय राऊत कोरोना आपत्ती | जाहीर आकडेवारी पेक्षा भारत आणि मेक्सिकोमध्ये दुप्पट मृत्यू - अमेरिकन इंस्टीट्यूटचं विश्लेषण
x

मराठा समाजाने सावध राहावं | भूमिका भाजपच्या कार्यालयात ठरतात | मेटेंचं भांड फुटलं

Maratha reservation, Vinayak Mete, EWS benefits

मुंबई, ५ जानेवारी: भारतीय जनता पक्षाच्या काही नेत्यांनी हा निर्णय घेऊ नये व ईड्ब्ल्यूएसचे आरक्षण दिल्यानंतर कोर्टामध्ये एसईबीसीचा लाभ घेण्याकरता न्यायालयीन लढाई कमजोर होईल अशी भूमिका मांडली तर विनायक मेटेंसारख्या नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना १६/०९/२०२० रोजी पत्र देऊन ईड्ब्ल्यूएस आरक्षण द्यावे अशी मागणी केली होती. सरकारने तसा निर्णय घेतल्यानंतर त्याचे स्वागतही मेटेंनी केले होते. भाजपा नेत्यांमध्येच एकवाक्यता नसल्याने शासनाने ईडब्ल्यूएसचा निर्णय स्थगित केला होता व या नेत्यांना एकवाक्यता करण्यास सांगितले परंतु पुढील कालावधीत अनेक विद्यार्थी ईडब्ल्यूएसचे आरक्षण लागू करावे यासाठी न्यायालयात गेले आणि अनेक प्रकरणात न्यायालाने ती मागणी मान्य केली.

BhagyaVivah Marathi Matrimonial

हायकोर्टाने तर महाराष्ट्र शासनाला आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा असे देखील सांगितले. या पार्श्वभूमीवर सरकारने ईडब्ल्यूएस आरक्षण वैकल्पीक स्वरुपात उपलब्ध करुन देण्याचा निर्णय न्यायालयीन आदेशाच्या पार्श्वभूमिवर घेतला. आता मात्र विनायक मेटेंसारखे नेते लगेच भुमिका बदलू लागले आहेत. आता त्यांच्या म्हणण्यानुसार ईडब्ल्यूएसचे आरक्षण दिल्यानंतर एसईबीसीचे आरक्षण मिळणे दुरापास्त होईल. या बदललेल्या भूमिका मराठा समाजाला दिशाभूल करण्यासाठी आहेत आणि राजकीय स्वार्थासाठी आहेत. अशा दुटप्पी मंडळींपासून मराठा समाजाने सावध राहण्याची गरज आहे कारण या भूमिका भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात ठरतात, असे देखील सावंत म्हणाले.

तत्पूर्वी, दरम्यान, मराठा आरक्षणाच्या उपसमितीच्या अध्यक्षपदावरुन अशोक चव्हाण यांना हटवण्याची मागणी करणाऱ्या विनायक मेटेंवर काँग्रेसने पलटवार केला होता. त्यांच्या सर्वसमावेशक आणि सावध भूमिकेमुळे मराठा आरक्षणाची बाजू भक्कम होत असल्याने छुपी कारस्थानं करणाऱ्या मेटेंच्या बोलवते धनी असलेल्या भाजपा नेत्यांच्या पोटात दुखू लागलं आहे,’ असं ट्विट काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केलं यापूर्वी केलं होतं.

‘आज मराठा आरक्षणावर कोणतीही स्थगिती नाही, तसंच वकीलही पूर्वीच्याच सरकारने नेमलेले आहेत. विनायक मेटे धादांत खोटे बोलत आहेत. जनतेची दिशाभूल ते फडणवीसांच्या इशाऱ्यावर करत आहेत. फडणवीसांच्या पायावर घालीन लोटांगण वंदिन चरण म्हणणाऱ्या मेटेंचा खरा भाजपाचा चेहरा मराठा समाज ओळखून आहे,’ अशी टीका सचिन सावंत यांनी केली होती.

 

News English Summary: While some BJP leaders have said that the decision should not be taken and that the court battle will be weakened in the court to take advantage of SEBC after the reservation of EWS, leaders like Vinayak Meten had written a letter to Chief Minister Uddhav Thackeray on 16/09/2020 demanding reservation for EWS. Mete also welcomed the government’s decision. The government had postponed the EWS decision as there was no consensus among the BJP leaders and asked them to unite, but in the ensuing period, many students went to court to enforce the EWS reservation and in many cases the court granted the demand.

News English Title: Maratha reservation double stand of Vinayak Mete over EWS benefits news updates.

हॅशटॅग्स

#Maratha Kranti Morcha(123)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x