13 November 2019 11:55 PM
अँप डाउनलोड

उदयनराजेंच्या बालिश चाळयांना पाठिशी घालून काय मिळालं साहेब? : जितेंद्र आव्हाड

NCP MLA Jitendra Awhad, MP Udayanraje Bhosale, NCP, Sharad Pawar

मुंबई : एनसीपीच्या खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर उदयनराजे भोसले यांनी आज अधिकृतपणे भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, जे पी नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उदयनराजे भोसले भाजपमध्ये सामील झाले. परंतु उदयनराजेंच्या या प्रवेशानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार टीकास्त्र सोडलं.

उदयनराजे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज होते म्हणून मी त्यांच्याशी आदराने बोलायचो, मात्र मी त्यांना कधीच नेता मानलं नाही. तसेच उदयनराजेंना विरोध असताना देखील शरद पवारांनी त्या विरोधाला न जुमानता नेहमीच उदयनराजेंच्या पाठीशी उभे राहिले, तर कॅालर उडवायची स्टाइल अशा चाळ्यांना देखील शरद पवार काही बोलले नाही कारण त्यांना सर्व माफ होतं. तसेच उदयनराजेंच्या जागी मी असतो तर माझी पक्षातून हकालपट्टी केली असती असे देखील त्यांनी एका मराठी वृत्तवाहीनीला प्रतिक्रिया देत म्हणटले आहे.

काय ट्विट केलं आहे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी;

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या