18 November 2019 12:26 AM
अँप डाउनलोड

मेट्रो ३ : भुयारीकरणाच्या कामादरम्यान बोगद्याचा काही भाग कोसळला; एका कामगाराचा मृत्यू

Mumbai Metro, Mumbai Infrastructure, Mumbai Metro 3 Project, MMRC, MMRDA

मुंबई: कुलाबा- वांद्रे-सीप्झ या मेट्रो 3 मार्गिकेच्या भुयारीकरणाचे काम सध्या सुरू आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनमार्फत हे काम करण्यात येत असून सात टप्प्यात हे काम सुरू आहे. दरम्यान, शुक्रवारी भुयारीकरणाच्या कामादरम्यान अचानक बोगद्याचा काही भाग कोसळला आणि यामध्ये एका कामगाराचा मृत्यू झाला. टनल बोअरिंगच्या दरम्यान ही घटना घडल्याचे समोर आलं आहे.

पवई येथे भूमिगत मेट्रो ३ चे काम सुरू होते. बोगद्याच्या बाजूला जो सुरक्षित भाग असतो, जिथे आपत्कालीन परिस्थितीत मेट्रो मध्ये बिघाड झाला तर पादचारी उतरून चालू शकतात, त्या ठिकाणी मनुष्यबळ वापरून खोदकाम सुरू असताना अचानक काही भाग कोसळला. या घटनेत एक कामगार ठार झाला.

मेट्रो कॉर्पोरेशनचे संचालक एस. के. गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा कामगार खडक फोडत होता तेव्हा तो खडक त्याच्यावर कोसळला. त्या कामगाराच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई देण्यात येणार आहे.

हॅशटॅग्स

#Mumbai(57)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या