27 July 2024 11:40 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांच्या खात्यात दर महिना रु.20,050 येतील, महिना खर्चाची चिंता मिटेल Post Office Scheme | सरकारी योजनेत फायदाच फायदा! 95 रुपयांच्या बचतीवर मिळतील 14 लाख रुपये, संधी सोडू नका Reliance Power Share Price | कर्जमुक्त कंपनी रिलायन्स पॉवरचा शेअर 'पॉवर' दाखवणार, 29 रुपयांचा शेअर खरेदीला गर्दी Smart Investment | पैशाने पैसा बनवतो हा फॉर्म्युला, वयाच्या 40 आधीच स्वतःचा आलिशान फ्लॅट खरेदी करू शकाल OTT Most Watch Film | OTT वर सर्वाधिक पाहिले जात आहेत हे हिंदी चित्रपट, थ्रिलर सिनेमा टॉप ट्रेंडमध्ये Upcoming Movies | 15 ऑगस्टला बॉक्स ऑफिस धमाका; या चार सिनेमांची चित्रपटगृहात होणारं थेट भेट Bonus Share News | कमाईची संधी सोडू नका! ही कंपनी फ्री शेअर्स देणार, शॉर्ट टर्म मध्ये पैसा वाढवा
x

अमृता फडणवीस यांची शिवसेनेवर थेट 'फक्त कमिशनसाठी' असा शब्दप्रयोग करत टीका

Amruta Fadnavis, Shivsena, Uddhav Thackeray

मुंबई: औरंगाबादमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी एक हजार झाडं तोडणार असल्याची माहिती समोर आली. त्यावरून बराच गोंधळ सुरू झाला. अनेकांनी सोशल मीडियातून यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. याच मुद्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

अमृता फडणवीस यांनी औरंगाबादमधील वृक्षतोडीकडे लक्ष वेधून शिवसेनेचं वृक्ष प्रेम बेगडी असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. औरंगाबादच्या प्रियदर्शनी उद्यानात १७ एकर जागेवर बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक होणार आहे. त्यासाठी ६४ कोटींची निविदा प्रक्रिया विचाराधीन आहे. या स्मारकासाठी शासनाकडून ५ कोटी रुपये देण्यात आले आहेत. या स्मारकाच्या आड एक हजार झाडं येत असल्याने ही झाडं तोडण्यात येणार असल्याची माहिती उघड झाल्याने हे ट्विटर वॉर सुरू झालं आहे.

प्रियदर्शनी उद्यानात हे सगळं उभं करायचं असेल तर किमान पाच हजार झाडं तोडावी लागतील, असे पर्यावरण तज्ज्ञांचे मत आहे. या मनमानीविरुद्ध पर्यावरण प्रेमींनी आवाज उठवला आहे. ग्रीन औरंगाबाद फोरमच्या माध्यमातून सकारात्मक आंदोलन सुरु झालं आहे. ६ वर्षांच्या मुलांपासून ते साठीतले आजोबाही झाडं वाचवण्यासाठी आंदोलनात सहभागी झाले. दरम्यान, उद्यान विभागाच्या कृपेनं भर उन्हात झाडं पाण्याअभावी काळी पडत होती, मरत होती. हे पाहून पर्यावरणप्रेमींनी वॉक अँड वॉटर (#WalkAndWater) हा अभिनव उपक्रम हाती घेतला. त्यामुळे अनेक झाडं वाचली.

दरम्यान, अमृता फडणवीस यांनी ट्वीट करुन शिवसेनेवर बोचऱ्या शब्दांमध्ये टीका केली आहे. औरंगाबाद येथे दिवंगत नेते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक होत आहे. त्यासाठी, शिवसेना १ हजार झाडं तोडणार आहे. त्यावरुन Get Well Soon शिवसेना असे म्हणत अमृता फडणवीस यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. हे फक्त कमिशनसाठी सुरू आहे. शिवसेनेचा ढोंगीपणा यातून समोर येतो असंही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.

 

Amruta Fadnavis Criticized Shivsena over Commission Politics

हॅशटॅग्स

#Amruta Fadnavis(82)#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x