13 December 2024 12:14 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

पुरावे! मनसेने नाही तर गंभीरने ते फोटो अर्धवट माहितीवर ट्विट करून अफवा पसरवल्या होत्या

BJP Maharashtra, MNS, Raj Thackeray, Ashish Shelar, Gautam Gambhir

मुंबई : सध्या मनसे आणि भाजपमध्ये पुन्हा ट्विटर वॉर सुरु झाले आहे. भावनिक विषयांना पुढे करून राजकारण करणारी भाजप स्वतःच्या अर्धवट ज्ञानातून पून्हा तोंडघशी पडली आहे असंच म्हणावं लागेल. त्यात भर म्हणजे काही दिवसांपूर्वी आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांच्या लाव रे व्हिडिओ मोहिमेला प्रतीउत्तर देताना अनवेरिफाईड अकाउंटचा आसरा घेत स्वतःचा बचाव केला होता आणि राज ठाकरे यांनी भाजपच्या अधिकृत अकाउंटचा पुरावा द्यायला हवा होता असं म्हटलं होत.

मात्र आज भाजपनेच मनसेच्या कोणत्याही अधिकृत अकाउंटचा पुरावा न देता अनवेरिफाईड अकाउंटचा आसरा घेत मनसेला कात्रीत पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात ते स्वतःच फसले आहेत. गडचिरोलीतील शहीद झालेल्या जवानांचे पार्थिव खोक्यात ठेवल्याचे दिसत होते. हा प्रकार भाजपाने ट्विटरवर पोस्ट करुन छायाचित्र गडचिरोलीतील नसून २०१७ मधील अरुणाचल प्रदेशमधील असल्याचे सांगितले होते. निवडणुका संपल्या तरी मनसेचा खोट्या आणि बनावट फोटो आणि व्हिडिओचा स्पॉन्सर्ड धंदा संपलेला दिसत नाही. वस्तुतः ऑक्टोबर २०१७ चे अरुणाचल प्रदेशमधील फोटो वापरून हे फोटो गडचिरोली शहिदांचे म्हणून पसरवले जात आहेत. त्यांना याची लाज वाटली पाहिजे, असे भाजपाने म्हटले होते.

वास्तविक ६ ऑक्टोबर २०१७ रोजी अरुणाचल प्रदेशातील तवांग येथे भारतीय वायुदलाच्या एमआय १७ व्ही५ या हेलिकॉप्टरला अपघात झाला होता आणि त्यातील ७ जवान शहीद झाले होते. दरम्यान, शोध मोहीम जोरदारपणे सुरु होती, त्यावेळी मोठ्या शोधमोहिमेनंतर जवानांचे शव सापडले होते मात्र अत्यंत वाईट स्थितीत जळाले होते. दरम्यान, शोधमोहिमेच्या संबंधित ठिकाणी शवपेट्या उपलब्ध नसल्याने त्यांची पार्थिव काही वेळासाठी जाड पुठ्ठयात गुंडाळून ठेवण्यात आले होते आणि शवपेट्यांची रसद पोहोचताच त्याना शहीद जवानांना आदरपूर्वक आणि लष्कराच्या प्रथेनुसार त्यांच्या कुटुंबीयांकडे सोपविण्यात आले होते.

मात्र काही महिन्यापूर्वी आर्थिक गैरव्यवहारात अडकलेला क्रिकेटपटू अचानक स्वतःची कातडी वाचविण्यासाठी भाजपच्या प्रेमात पडला. दरम्यान, सध्या चौकीदाराच्या भूमिकेत असलेला आणि भाजपचा दिल्लीतील लोकसभा निवडणुकीचा उमेदवार गौतम गंभीर यांने याच ऑक्टोबर २०१७ मधील वायुदलाच्या अपघातातील शहीद जवानांचे प्राथमिक शोधमोहिमेतील फोटो ट्विट करून अप्रत्यक्षरित्या मोदी सरकारला ‘लाज वाटली पाहिजे’ असं म्हणत स्वतःचा अतिउत्साहीपणा दाखवला होता आणि अर्धवट माहितीचा दाखला दिला होता. वास्तविक त्याने या अफवा समाज माध्यमांवर चुकीच्या प्रकारे पसरवल्या होत्या, ज्यावर स्वतः भारतीय वायुदलाने अधिकृत ट्विट करत अति उत्साही नेटकऱ्यांचे कान टोचले होते. दरम्यान, राज ठाकरे आणि मनसेच्या द्वेषाने पछाडलेल्या महाराष्ट्र भाजपने नेमका तोच अतिउत्साहीपणा आज दाखवत मनसेच्या कोणत्याही अधिकृत अकाऊंटवरून शेअर न झालेल्या गोष्टींचा संदर्भ गडचिरोली सारख्या संवेदनशील आणि भावनिक विषयाशी जोडण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला आणि स्वतःच तोंडघशी पडले आहेत.

हे आहेत ते सर्व अधिकृत पुरावे?

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x