12 August 2020 3:01 PM
अँप डाउनलोड

जळगाव: ट्रक आणि कारच्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील १० जणांचा मृत्यू

Heavy Accident Jalgaon

जळगावः जळगाव जिल्ह्यात ट्रक आणि कारच्या झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील १० जणांचा मृत्यू झाला असून सांगली जिल्ह्यात कार चालकाचे निंयत्रण सुटल्याने ही कार विहिरीत पडल्याने पाच जणांचा मृत्यू झाला आहे. या दोन्ही अपघातात एकूण १५ प्रवाशांचा मृत्यू झाल्याने रविवारचा दिवस अपघातवार ठरला आहे. दोन्ही अपघात रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडले आहे.

महाराष्ट्रनामा अँप डाउनलोड - कोविड - १९ डॅशबोर्ड

प्रसार माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातल्या यावल तालुक्यातील यावल-फैजपूर रस्त्यावरील हिंगोणे गावाजवळ हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात मृत्यू पावलेले लोक हे चौधरी आणि महाजन कुटुंबातील आहेत. ते एकमेकांचे नातेवाईक असून चोपडा येथून एक लग्न समारंभ आटोपून क्रूझर जीपमधून घरी येत असताना ही दुर्घटना घडली. डंपर आणि क्रूझरची समोरासमोर भीषण धडक झाल्याने क्रूझरचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे.

प्रभाबाई प्रभाकर चौधरी (४५), सोनाली जितेंद्र चौधरी (३५) सोनल सचिन महाजन (३७), गंगाबाई ज्ञानेश्‍वर चौधरी (३५) उमेश चौधरी (२८) प्रभाकर नारायण चौधरी (६३) प्रिया जितेंद्र चौधरी (१०) प्रियंका नितीन चौधरी (२५) सुमनबाई श्रीराम पाटील (६०) संगीता मुकेश पाटील (३३) अशी अपघातात ठार झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. तर, सर्वेश नितीन चौधरी, शंतनू मुकेश पाटील, अंवी नितीन चौधरी, मीना प्रफुल्ल चौधरी, सुनिता राजाराम चौधरी, आदिती मुकेश पाटील आणि शिवम प्रभाकर चौधरी हे जखमी झाले आहेत.

 

Web Title:  Heavy accident happened in dumper and cruisers at Jalgaon 10 people dead.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Accident(12)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x