11 December 2024 2:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vedanta Share Price | वेदांता शेअरने विक्रमी उच्चांक गाठला, पुढे रॉकेट तेजी, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: VEDL Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल IPO GMP | आला रे आला IPO आला, गुंतवणुकीची मोठी संधी, पहिल्याच दिवशी मिळेल मोठा परतावा - GMP IPO 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, जानेवारी 2025 मध्ये महागाई भत्ता इतका वाढणार, अपडेट आली Shukra Rashi Parivartan | डिसेंबरच्या 'या' तारखेपासून शुक्र गोचरमुळे काही राशींना भोगावे लागू शकतात गंभीर परिणाम
x

VIDEO | शिवसेना खा. विनायक राऊत मास्क काढून बैठकीतच शिंकले | बेजवाबदार लोकप्रतिनिधी

Ratnagiri Sindhudurg,  MP Vinayak Raut, removes mask , Sneezes

रत्नागिरी, २ नोव्हेंबर: राज्यात सध्या कोरोनामुळे होणारा मृत्युदर कमी झाला असला तरी कोरोनाचा एकूण परिणाम सुरूच आहे आणि रोज नवनवी आकडेवारी समोर येतं आहे. दरम्यान, राज्य सरकारकडून वारंवार सामान्य लोकांना मास्क वापरण्याचं आवाहन करण्यात येतं आहे. कोरोनावर अजून लस आली नसल्याने मास्क आणि इतर उपाय योजनाच सध्या कोरोनावर उपाय असल्याचा सरकार वारंवार सांगत आहे.

मात्र राज्यातील लोक प्रनिधींनाच याचं गांभीर्य उरलं नसून स्वतःसोबत इतरांचा जीव देखील धोक्यात घालण्याचा प्रकार शिवसेनेच्या खासदाराकडून घडला आहे. आमदार नितेश राणे यासंदर्भातील व्हिडिओ ट्विट करत शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांचा संतापजनक आणि बेजवाबदारपणाचा पुरावा समोर आणला आहे.

झालं असं की महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार सिंधुदूर्गच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी एका आयोजित बैठकीत त्यांच्याबाजूलाच शिवसेनेचे खासदार विनायक राऊत देखील उपस्थित होते. मात्र दोघांच्याही तोंडावर मास्क होते. दरम्यान, मंत्री अब्दुल सत्तार बोलत असताना बाजुला बसलेल्या विनायक राऊतांना अचानक शिंक आली. वास्तविक त्यांच्या तोंडावर मास्क होता आणि आपल्याला शिंक आल्यास ड्राप्लेट्स इतरांवर जाऊ नये म्हणून मास्क असतं. त्यामुळे कोरोनाचा प्रसार होऊ नये हा त्यामागील मुख्य उद्देश असतो.

मात्र, विनायक राऊत यांनी शिंक येताच स्वतःच्या गावराण सवयीप्रमाणे हात समोर धरला आणि तोंडावर मास्क बाजूला काढून तोंडावर हात ठेवत शिंकले आणि नंतर पुन्हा मास्क घातला. नेमका हाच व्हिडीओ आमदार नितेश राणे यांनी पोस्ट करत त्यांच्या बेजवाबदारपणावर टीकास्त्र सोडलं आहे.

 

News English Summary: Minister of State for Revenue Abdul Sattar was on a visit to Sindhudurg. Shiv Sena MP Vinayak Raut was also present beside him in a meeting held at this time. But both of them had masks on their faces. Meanwhile, Vinayak Raut, who was sitting next to Minister Abdul Sattar, suddenly sneezed while he was speaking. They actually had a mask on their face, and if you sneeze, there is a mask so that the droplets don’t go on others. So the main purpose behind it is not to spread the corona. However, as soon as Vinayak Raut came to sneeze, he held his hand in front of him as per his habit of sneezing and removed the mask from his face, put his hand on his mouth and sneezed and then put on the mask again. This is exactly the video posted by MLA Nitesh Rane who has castigated him for his irresponsibility.

News English Title: Ratnagiri Sindhudurg  MP Vinayak Raut removes mask and sneezes during meeting News updates.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x