27 July 2024 9:50 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

कोकणातील रिफायनरीला स्थानिकांचा प्रचंड विरोध | मात्र भाजप-शिंदे गटाच्या सरकारचं कोकणी जनतेच्या रोषाकडे दुर्लक्ष

Dhopeshwar Barsu refinery

Konkan Refinery Project | कोकणातील रिफायनरीला स्थानिकांचा विरोध कायम आहे. राजापूर तालुक्यातील गोवळ गावातमधील सर्व्हे आणि माती परीक्षण रोखण्याची स्थानिकांनी मागणी केली आहे. सर्व्हे सुरू झाल्यानंतर स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने जमा झाले. आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे ड्रोन आणि माती परीक्षणासाठी पोलिसांनी फौज फाटा तैनात केला आहे. परंतु,यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचा आंदोलकांनी आरोप केला होता.

राजापूर तालुक्यातील गोवळ गावात काल सर्व्हे कण्यात येणार होते. परंतु, स्थानिकांनी या सर्व्हेला जोरदार विरोध केला आहे. सर्व्हे सुरू झाल्यानंतर स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने जमा झाले आणि सर्व्हे रोखण्यात यावा अशी मागणी केली. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु, सर्व्हे रोखण्यात न आल्यामुळे आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली होती.

आज देखिल धोपेश्वर रिफायनरीच्या सर्व्हेक्षणाच्या पाहणीसाठी आलेल्या निलेश राणेंचा ताफा विरोधकांनी अडवला. प्रदुषणाच्या मद्यावर हा विनाशकारी प्रकल्प नको अशी भूमिका इथल्या रिफानरी विरोधक ग्रामस्थांनी घेतलीय. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी देखिल धोपेश्वर रिफायनरी प्रकल्पाला पहिल्यापासूनच विरोध केलाय.

कोकण रिफायनरी प्रकल्प विरोधी संघटनेची भूमिका :
कोकणात आम्ही कुठेली रिफायनरी प्रकल्प होवू देणार नाही अशी भुमिका कोकण रिफायनरी प्रकल्प विरोधी संघटनेचे अध्यक्ष अशोक वालम यांनी पुन्हा एकदा सष्ट केलीय. या बाबत बालम म्हणाले कि आम्ही अत्तापर्यत वेट अँण्ड वॉचची भुमिका घेतली होती. जो पर्यत सरकार पाऊल टाकत नाही तो पर्यत आम्ही शांत होतो.पण आम्ही विषय सोडलेला नाही.ज्यावेळी प्रकल्पासाठी शंभर टक्के लोकं अनुकुल असतील त्यावेळी हा प्रकल्प करावा असा उदय सामंत यांच्या वक्तव्याचा अर्थ आहे त्यामुळे याचे आम्ही स्वागत करतोय. कोकणात हा प्रकल्प नको यासाठी येत्या काही दिवसात आम्ही शासनासोबत वाटाघाटी करू असं अशोक वालम यांनी सष्ट केलं.शासनाच्या बैठकीला आम्ही नक्की जावू असंही अशोक वालम यांनी सष्ट केलं.

नाणार रिफायनरी प्रकल्पाच्या वेळी भाजप सोडल्यास इतर सर्व पक्षांचा या प्रकल्पाला विरोध होता. आता परिस्थिती बदललेली आहे. आता शिंदेंना मुख्यमंत्री पदी बसवून भाजप दिल्लीतील वरिष्ठांच्या मर्जीतील प्रकल्प कोणत्याही मार्गाने पास करण्याच्या प्रयत्नात आहेत. मुंबई आणि महाराष्ट्राच्या हिताचे नसलेले प्रकल्प म्हणजे आरे जंगलातील मेट्रो कार शेड (पर्यावरणाला धोका), मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन (फायदा फक्त गुजरातला) आणि कोकणातील रिफायनरी प्रकल्प यांचा समावेश आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Dhopeshwar Barsu refinery issue flares up in Konkan 51 organizations including BJP support the refinery 21 August 2022.

हॅशटॅग्स

#Dhopeshwar Barsu refinery(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x