14 December 2024 5:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

VIDEO: शहीदांवर अंत्यसंस्कार, भाजप मंत्री पायात बूट घालून बसले व हसत गप्पा सुरु, स्थानिक संतापले

Narendra Modi, Guajarat, Pulawama Attack, Bharatiya Janata party

वडोदरा : जम्मू काश्मीरमध्ये पुलवामा जिल्ह्यात दहशदवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात सीआरपीएफचे तब्बल ४० जवान शहीद झाल्यानंतर देशभरात संतापाची लाट आलेली आहे. प्रत्येक भारतीय देशभक्तीने पेटून उठलेला असताना, सत्ताधारी भाजपचे मंत्र्यांची असंवेदनशीलता अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. तसाच काहीसा प्रकार उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे घडला आहे. त्यानंतर स्थानिकांमध्ये संतापाचं वातावरण असल्याचं पाहायला मिळालं.

पुलवामा येथील दहशदवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात मेरठ तेथील रहिवासी असलेले जवान अजय कुमार देखील शहीद झाले. त्यांच्यावर काल गाझियाबाद येथील निवाड़ी येथे अंत्यविधी करण्यात आल्या. दरम्यान, यावेळी त्यांच्या कुटूंबीयांसोबत स्थानिकांनी प्रचंड गर्दी केली होती. त्यावेळी भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री सत्यपाल सिंह, उत्तर प्रदेशातील भाजपचे नेते सिद्धार्थ नाथ सिंह, मेरठचे भाजप खासदार राजेंद्र अग्रवाल आणि भाजप नेते विनीत शारदा तसेच अनेक भाजप नेते मंडळी उपस्थित होती.

त्यावेळी अंत्यविधीला हजेरी लावून हे भाजप नेते मंडळी पायात बूट घालूनच बसले आणि एकमेकांसोबत हसत गप्पा मारताना दिसले. स्थानकांमध्ये शांतता आणि कुटूंबियांची अनावर झालेला शोक समोर असताना देखील भाजपचे हे नेते असंवेदनशीलतेचं दर्शन घडवत होते. त्यामुळे त्यांना हसताना आणि एकमेकांशी गप्पा मारताना पाहून स्थानिकांचा संताप अनावर झाला आणि त्यांनीही भाजपच्या नेत्यांना चांगलेच सुनावून अपमानित केले. या घटनेमुळे शहीद जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रती सत्ताधाऱ्यांची आस्था ही केवळ देखावा असल्याची चर्चा स्थानिक माध्यमांमध्ये देखील आहे. परंतु, यातून एकच संतापाची लाट पसरली आहे. देशवासीयांची राष्ट्रापतीची भावना आणि शहीद जवान म्हणजे मतपेटी वाढवण्याचं साधन मानलं जात आहे. यामुळे भारतीय जनता पक्षाचं किळसवाणं राजकारण समोर आलं आहे. शहीद जवानांच्या नावाने उद्या भाजपने मतं मागितल्यास नवल वाटणार नाही. परंतु भारतीय म्हणून सामान्य लोकं हे किती सहन करणार हा देखील प्रश्न येतोच.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x