21 April 2021 11:50 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
आमच्याकडे ऑक्सिजन संपला आहे, तुमचे रुग्ण घेऊन जा | यूपीत अनेक इस्पितळांचा पत्रकांचा सपाटा Health first | दातांचा पिवळेपणा नाहीसा करण्यासाठी करा हे घरगुती उपाय । नक्की वाचा नाशिक दुर्घटना अतिशय वेदनादायी, पण बेपर्वाई करणाऱ्यांना कडक शासन व्हायलाच हवं - राज ठाकरे Health first | प्रवास करताना मळमळ किंवा उल्टी होतेय तर हे करा घरगुती उपाय । नक्की वाचा PPE किट, व्हेंटीलेटर्स, लस ते ऑक्सिजन असं सर्वच प्रथम परदेशात पाठवलं | सर्वांची टंचाई भारतीय भोगत आहेत नाशिक दुर्घटना | मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त | मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपये मदत जाहीर Health first | चहाचा अतिरेक करू नका नाहीतर आरोग्यावर होतील त्याचे वाईट परिणाम । नक्की वाचा
x

इनकमिंग सुरूच | सोलापुरात एमआयएमचे ६ नगरसेवक राष्ट्रवादीच्या वाटेवर

MIM leader Taufik Shaikh, NCP, 6 corporators

सोलापूर, ६ जानेवारी: विधानसभा निवणुकीनंतर राज्यात पवारांच्या करिष्म्याने महाविकास आघाडी सरकार आलं आणि त्यानंतर शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीनंतरच्या यशानंतर इतर पक्षातील नेते मंडळी राष्ट्रवादीत भविष्यकाळ शोधू लागले आहेत असंच म्हणावं लागेल. त्या अनुषंगाने राष्ट्रवादीत जोरदार इनकमिंग सुरु आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

कारण आता सोलापूरमधील एमआयएम पक्षाचे नेते तौफिक शेख यांची भर पडली आहे. मागील काही दिवसांपासून तौफिक शेख राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु झाली होती. परंतु, आता त्यांच्या पक्षप्रवेशावर शिक्कामोर्तब झाले आहे. तौफिक शेख यांनी नुकतीच मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि नवाब मलिक यांची भेट घेतली. आता ते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची वेळ घेऊन ६ नगरसेवकांसह सोलापुरमध्येच कार्यक्रम घेऊन राष्ट्रवादीत प्रवेश करतील.

सोलापूर महानगरपालिकेतील दहापैकी सहा नगरसेवक तौफिक शेख यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. तर उर्वरित चार नगरसेवकांनीही पक्षाला अलविदा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एमआयएमचे पालिकेतील संख्याबळ दहावरून थेट शून्य होणार आहे.

तत्पूर्वी नवी मुंबईत राष्ट्रवादीने भारतीय जनता पक्षाला जोरदार राजकीय धक्का दिला होता. भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविकेसह माजी नगरसेवकाने राष्ट्रवादीचा झेंडा हाती धरला. भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका दिव्या गायकवाड आणि माजी नगरसेवक वैभव गायकवाड यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला.

नवी मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर राजकीय वारे वाहू लागले आहेत. दिव्या गायकवाड प्रभाग क्रमांक 64 मधून नगरसेवकपदी निवडून आल्या होत्या. राष्ट्रवादीचे तत्कालीन नेते गणेश नाईक यांच्यासह गायकवाडांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. परंतु आता गायकवाड दाम्पत्याने राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधले आहे.

 

News English Summary: MIM party leader Taufiq Sheikh from Solapur has been added. For the past few days, there had been talk that Tawfiq Sheikh would join the NCP. But now his entry into the party has been sealed. Taufiq Sheikh recently met Deputy Chief Minister Ajit Pawar and Nawab Malik in Mumbai. Now he will take the time of state president Jayant Patil and join NCP with 6 corporators in Solapur.

News English Title: MIM leader Taufik Shaikh will join NCP soon wth 6 corporators news updates.

हॅशटॅग्स

#NCP(344)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x