6 July 2020 3:52 AM
अँप डाउनलोड

राज्यात ६५ ठिकाणी ईव्हिएममध्ये बिघाड; काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार

EVM, Ballet paper, EVM Hacking

मुंबई: संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या राज्य विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदानाला सुरूवात झाली आहे. राज्यातील अनेक भागांत कोसळणाऱ्या पावसामुळे निवडणूक यंत्रणांना रविवारी दिवसभर तारेवरची कसरत करावी लागली. राज्यातील ३,२३७ उमेदवारांचे भवितव्य आज ठरणार आहे. राज्य विधानसभेच्या २८८ जागा तर सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सोमवारी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होईल. राज्यात ८ कोटी ९८ लाख ३९ हजार ६०० मतदार आहेत. मतदान निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून, सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

महाराष्ट्रनामा अँप डाउनलोड - कोविड - १९ डॅशबोर्ड

सुमारे ९ कोटी मतदार या निवडणुकीत उतरलेल्या ३,२३७ उमेदवारांच्या राजकीय भवितव्याचा फैसला करणार आहेत. महिनाभर सुरू असलेल्या राजकीय रणधुमाळीची शनिवारी सांयकाळी सांगता झाली. गेल्या ४८ तासांत वैयक्तिक भेटी-गाठी व इतर संपर्क साधनांच्या माध्यमांतून मतांची बेगमी करण्यावर उमेदवारांनी भर दिला. काही ठिकाणी पैसेवाटपावरून उमेदवारांच्या समर्थकांमध्ये बाचाबाचीचे प्रकार घडले.

राज्यात ७ ते ११ या चार तासांमध्ये सरासरी १२ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. ग्रामीण भागांमधील मतदारांमध्ये मतदानाचा उत्साह दिसत असून शहरी भागामध्ये मात्र कमी प्रमाणात मतदान होत असल्याचं चित्र दिसत आहे. तत्पूर्वी राज्यभरातून तब्बल ६५ ठिकाणी ईव्हिएममध्ये बिघाड झाल्याचं वृत्त असून या संदर्भात काँग्रेसने थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Election2019(13)#ElectionCommission(10)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x