26 May 2022 8:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

शेतकरी धर्मा पाटील यांची मृत्युशी झुंज अपयशी

मुंबई : धुळे विखरणचे शेतकरी धर्मा पाटील यांची मृत्युशी झुंज अखेर अपयशी ठरली. मंत्रालयात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्नं केला होतं. आज त्यांनी जेजे रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

सरकारने त्यांना संपादित करत असनलेल्या जमीनीचा योग्य मोबदला द्यावा यासाठी ते मंत्रालयात वारंवार हेलपाटे घालत होते. परंतु मायबाप सरकारकडून कोणतेच उत्तर मिळत नसल्याने निराश होऊन त्यांनी २२ जानेवारी रोजी अखेर मंत्रालयातच विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता.

त्यांच्यावर जेजे या शासकीय रुग्नालयात उपचार सुरु होते आणि त्या उपचारादरम्यान दरम्यान त्यांच्यावर ३ वेळा डायलिसिस करण्यात आले होते. शेतकरी धर्मा पाटील हे मूळचे धुळे जिल्हातील विखरण चे रहिवासी होते. सर्वात महत्वाचं म्हणजे धर्मा पाटील यांच्या मुलाने अवयवदानाचा अर्ज केला होता त्याप्रमाणे त्यांच्या निधनानंतर त्यांचे निकामी न झालेले अवयव दान करण्यात येतील. त्यांच्या निधनाने युती सरकारवर चोहो बाजूने टीका होत आहे.

जो पर्यंत धर्मा पाटील यांना जमिनीचा योग्य मोबदला मिळत नाही आणि धर्मा पाटील यांना शहीद भूमिपुत्र शेतकरी हा दर्जा देण्याचं लिखित आश्वासन सरकार देणार नाही, तो पर्यंत मी माझ्या वडिलांचा मृतदेह स्वीकारणार नाही अशी भूमिका धर्मा पाटील यांचा मुलगा नरेंद्र पाटील यांनी घेतली आहे.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x