26 May 2022 6:58 PM
अँप डाउनलोड

रॉजर फेडररला पुन्हा ऑस्ट्रेलियन ओपन विजेता

मेलबर्न : स्वित्झर्लंडचा टेनिसस्टार रॉजर फेडरर ठरला यंदाचा ऑस्ट्रेलियन ओपन पुरुष एकेरीत विजेता ठरला. हे त्याच्या करियरमधलं तब्बल विसावं ग्रँडस्लॅम जेतेपद आणि सहावं ऑस्ट्रेलियन ओपन पुरुष एकेरीच विजेतेपद आहे. त्याने अंतिम सामन्यात मरिन चिलीच या क्रोएशियाच्या टेनिसपटूवर मात केली.

वयाच्या अवघ्या ३६ व्या वर्षीच त्याने विसावं ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावन्याचा पराक्रम केला आहे.हा सामना तब्बल तीन तास तीन मिनिटं चालला आणि फेडररने मरिन चिलीचवर ६-२, ६-७, ६-३, ३-६, ६-१ अशी एकूण पाच सेट्समध्ये मात केली आणि २०१८ मधील मधील पाहिलं ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावलं. गतवर्षी फेडररने ग्रीन कोर्टचा बादशहा राफेल नादालला धोबीपछाड करत ऑस्ट्रेलियन ओपन टायटल जिंकलं होतं.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x