नवी दिल्ली : भाजप प्रणित एनडीएतला एक एक घटक पक्ष भाजप पासून फारकत घेऊन स्वतंत्र लोकसभा निवडणुका लढवण्याची घोषणा करू लागला आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेनेने तशी अधिकृत घोषणाही केली आहे आणि आता एनडीए मधील आणखी एक घटक पक्ष टीडीपी ने भाजपला स्वतंत्र लढण्याचा इशारा दिला आहे. इतकेच नाही तर टीडीपीने २०१९ मधील लोकसभा निवडणुका स्वतंत्र लढण्याची तयारी चालू केली आहे.

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि तेलुगू देसम पार्टीचे (टीडीपी) सर्वेसर्वा यांनी एनडीएमधून बाहेर पडण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. टीडीपी हा एनडीए मधील खूप महत्वाचा घटक पक्ष म्हणून ओळखला जातो. टीडीपी ने भाजपला स्वतंत्र लढण्याचा इशारा दिला आहे. इतकेच नाही तर टीडीपीने २०१९ मधील लोकसभा निवडणुका स्वतंत्र लढण्याची तयारी चालू केली आहे.

राज्यातील राजकीय हालचाली पाहता भाजपालाच ही युती टिकवायची आहे असे दिसत नाही. त्यामुळे आम्ही सुध्दा २०१९ च्या निवडणूका स्वतंत्र लढण्यास सक्षम आहोत असे ही आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू म्हणाले. जर आंध्र प्रदेशातील टीडीपीसारखा मोठा पक्षही बाहेर पडून स्वबळावर लढल्यास भाजपप्रणित एनडीएला मोठा धक्का असेल आणि २०१९ मधील निवडणुक भाजप साठी खूप कठीण होऊन बसतील.

We will walk out of NDA if BJP doesnt want alliance says TDP