28 April 2024 5:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट FD Interest Rate | पैशाने पैसा वाढवा! 1 वर्षाच्या FD वर या 3 बँक देत आहेत 7.75 टक्केपर्यंत व्याज, यादी सेव्ह करा
x

Viral Video | धार्मिक द्वेष शाळेत सुद्धा! वर्गातील हिंदू मुलांना एक-एक करून शिक्षकांनी उठवलं आणि मुस्लिम मित्राला मारायला सांगितलं

Viral Video

Viral Video | देशातील धामिर्क राजकारण आता शाळेत पोहोचलं आहे. विशेष म्हणजे शाळेतील शिक्षकच मुलांमध्ये हा द्वेष आणि हिंसक होण्याचे धडे देतं आहेत. उद्या हेच विष अनेक शाळांमध्ये पसरून आपलय मुलांचं भविष्य धोक्यात येऊ शकतं. भाजपची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये विष मोठ्या प्रमाणात पसरतंय हे अनेकदा पाहायला मिळालं आहे. उत्तर प्रदेशातील एका शाळेत हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

उत्तर प्रदेशातील मन्सूरपूर (मुजफ्फरनगर)। खुबापूर गावातील नेहा पब्लिक स्कूलमधील एका शिक्षिकेने विद्यार्थिनीला इतर विद्यार्थ्यांसोबत धार्मिक आधारावर मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये शिक्षक शिवीगाळ करत आहे. बीएसए शुभम शुक्ला यांनी सांगितले की, व्हिडिओची चौकशी केली जात आहे. महिला शिक्षिका व व्यवस्थापनावर कारवाई करण्यात येणार आहे असं म्हटलं आहे. शाळेतील मित्रांमध्ये धार्मिक फूट पाडून त्यांना एकमेकांविरोधात हिंसक होण्याचे धडे शाळेत दिले जातं आहेत हे अत्यंत भीषण आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये शिक्षक एका मुलाला वर्गात उभे करून इतर मुलांना त्याला मारण्यासाठी एकएक करून उठवत आहेत हे दिसतंय. पीडित मुलगा मुस्लीम असल्याचे सांगण्यात येत आहे, तसेच आपले मित्रच आपल्याला अशाप्रकारे मारत असल्याने तो रडताना देखील दिसत आहे. शिक्षिकाही एका तरुणाशी बोलत असून त्यात आक्षेपार्ह गोष्टी बोलल्या जात आहेत. व्हिडिओमध्ये शिवीगाळही ऐकू येत आहे. व्हिडिओ व्हायरल होताच शिक्षिका तृप्ता त्यागी यांच्या वागणुकीचा निषेध करण्यास सुरुवात झाली. बीएसएने हा ३४ सेकंदाचा व्हिडिओ गांभीर्याने घेत तपास सुरू केला आहे.

या व्हिडिओची तपासणी करण्यात आली आहे. शाळेतील शिक्षिका स्वत:च्या घरात ते चालवत आहेत. मी व्हिडिओमध्ये लोकांशी बोललो. काम न केल्याने शिक्षक व इतर विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्याला मारहाण केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाई केली जाईल असं रविशंकर शर्मा, सीओ खतौली यांनी म्हटलं आहे.

News Title : Viral Video child thrashed on religion basis Muzaffarnagar 26 August 2023.

हॅशटॅग्स

#Viral Video(161)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x