20 June 2021 4:07 PM
अँप डाउनलोड

कोरोना आपत्ती | भारताला नव्या पंतप्रधानांची गरज - स्वरा भास्कर

Swara Bhaskar

मुंबई, ०६ मे : सध्या देशाची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. करोनामुळे दररोज कित्येकांना आपला जीव गमवावा लागत आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढतच आहे. आरोग्य यंत्रणा अपुऱ्या पडत आहेत. कित्येक ठिकाणी ऑक्सिजनचा तुटवडा आहे. अनेक ठिकाणी रुग्णांना बेड मिळत नाहीयेत. या सर्व परिस्थितीसाठी बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर हिने केंद्र सरकारला जबाबदार धरलं आहे. सरकारच्या नियोजनशून्य कारभारावर ताशेरे ओढत स्वराने चक्क पंतप्रधान बदलण्याची मागणी केली. परंतु, तिच्या या मागणीमुळे नेटकऱ्यांनी स्वराला ट्रोल केलं.

BhagyaVivah Marathi Matrimonial

स्वरा भास्कर तिच्या ट्विटमध्ये म्हणते, “देशातील नागरिकांना आपल्या प्रिय आणि जवळच्या व्यक्तींना तडफडताना पहायचं नसेल तर या देशाला एका नव्या पंतप्रधानाची गरज आहे.” दरम्यान स्वराच्या या ट्विटनंतर अनेकांनी तिला ट्रोलंही केलं आहे.

एका युजरने स्वराच्या या ट्विटला रिप्लाय देताना म्हटलंय की, 2024 पर्यंत तरी असं काही होऊ शकत नाही. तर 2024 पर्यंत यांना सहन कर, त्यानंतर तुला योगीजींना सहन करायचं आहे. आम्ही फार खूश आहोत…तुझं तू बघून घे, असंही एका युजरने ट्विट करत स्वराला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे.

 

News English Summary: India needs a new PM. Unless Indians want to see their loved ones perish gasping for breath! said Bollywood actress Swara Bhaskar news updates.

News English Title: India needs a new Prime Minister said Bollywood actress Swara Bhaskar news updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1593)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x