18 April 2024 11:35 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPF Withdrawal Online | नोकरदारांसाठी खुशखबर! EPFO ने पैसे काढण्याचे नियम बदलले, आता दुप्पट पैसे काढू शकता Nippon India Mutual Fund | पगारदारांनो! या म्युच्युअल फंड योजना 46 टक्केपर्यंत परतावा देत आहेत, येथे पैसा वाढवा SBI Special Scheme | टेन्शन नको! सरकारी SBI बँकेची ही योजना दरमहा पैसे देईल, इतर फायदे सुद्धा मिळतील Numerology Horoscope | 18 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 18 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Stocks in Focus | गुंतवणुकीसाठी हे टॉप 4 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 33 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Tinna Rubber Share Price | श्रीमंत करतोय हा शेअर! 3 वर्षात 1 लाख रुपयाच्या गुंवतवणुकीवर दिला 4.42 कोटी परतावा
x

तामिळनाडूमध्ये आरएसएस'ची सत्ता येऊ देणार नाही

Rahul Gandhi, Congress, DMK, Tamil Nadu, RSS

कृष्णगिरी : तामिळनाडूवर नागपूरची म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची सत्ता कधीही येऊ देणार नाही, असे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी जाहीर केले. द्रमुकचे प्रमुख एम. के. स्टॅलिन तामिळनाडूचे लवकरच मुख्यमंत्री होतील, असा ठाम विश्वास देखील त्यांनी जाहीर सभेत व्यक्त केला.

राहुल गांधी म्हणाले की, नीरव मोदी, विजय मल्ल्यासारख्या उद्योगपतींनी बँकांची कर्जे बुडवली आणि थेट विदेशात पळून गेले. या सर्व कर्जबुडव्यांपैकी एकही जण अजून तुरुंगात गेलेला नाही. आगामी लोकसभा निवडणुकांनंतर काँग्रेस सत्तेवर आल्यास कर्ज न फेडता आलेल्या एकाही शेतकऱ्याला आम्ही तुरुंगात धाडणार नाही. कर्जबुडव्या श्रीमंत लोकांवर काहीही कारवाई होत नाही, परंतु त्याच गुन्ह्यापायी गरीब शेतकऱ्यांना शिक्षा सुनावली जाते हे अयोग्य आहे.

राहुल गांधी यांनी आरोप केला की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीरव मोदी, मेहुल चोकसीला प्रत्येकी ३५ हजार कोटी रुपये व विजय मल्ल्याला १० हजार कोटी रुपये दिले आहेत. गेल्या पाच वर्षांत मोदींनी आपल्या १५ मित्रांसाठीच सरकार चालविले त्या सर्वांची नावे जनतेला माहिती आहेत. त्यामध्ये अनिल अंबानी, नीरव मोदी, मेहुल चोकसी आदींचा समावेश आहे. पुढे राहुल गांधी यांनी सांगितले की, देशातील सर्वात गरिबांतील गरिब कुटुंबांना किमान उत्पन्नाची हमी देणारी न्याय योजना ही त्या लोकांमध्ये क्रयशक्ती निर्माण करेल. अशा योजनेमुळे तामिळनाडूमध्ये नवीन कारखाने उभारले जातील तसेच देशाच्या अर्थव्यवस्थेलाही मोठा फायदा होईल. तामिळनाडूमधील वस्त्रोद्योगनिर्मितीची आगारे असलेली तिरुपूर, कांचीपुरमसारखी ठिकाणे पुन्हा पहिल्यासारखीच बहरतील. त्यातून युवा पिढीसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.

हॅशटॅग्स

#Congress(527)#DMK(3)#Rahul Gandhi(251)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x