14 December 2024 8:52 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५७३४ वर; दिल्लीत योजनांची आखणी

Corona Crisis, Covid19, PM Narendra Modi

नवी दिल्ली, ०९ एप्रिल: बुधवारी ८ मार्च रोजी देशव्यापी लॉकडाऊनचा १६ वा दिवस… आज सायंकाळच्या सुमारास केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं एक पत्रकार परिषद घेऊन देशातील करोना फैलावाबद्दल माहिती दिली. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, आत्तापर्यंत जवळपास ४७३ रुग्णांवर उपचार यशस्वी ठरलेत. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलाय. तसंच आत्तापर्यंत देशात आढळलेल्या करोनाबाधित रुग्णांची संख्या आज ५७३४ वर पोहचलीय. उल्लेखनीय म्हणजे, यातले ५४९ रुग्ण गेल्या २४ तासांत सापडले आहेत.

कोरोना व्हायरसपासून बचाव करणारी उपकरणे, मास्क आणि व्हेंटिलेटर्सचा पुरवठा सुरु झाला आहे. देशातीलच २० उत्पादक पीपीईची निर्मिती करणार आहेत. ४९ हजार व्हेंटिलेटर्सची ऑर्डर देण्यात आली आहे. अशी माहिती लव अग्रवाल यांनी दिली. भारतीय रेल्वे ८० हजार आयसोलेश बेड सज्ज ठेवणार आहे. रेल्वे ५ हजार डबे आयसोलेश वॉर्डमध्ये बदलणार आहे. त्यातले ३२५० डबे आधीच आयसोलेशन वॉर्डमध्ये बदलले आहेत.

देशभरात कोरोनाचा फैलाव होतं असताना तो दुसऱ्या टप्यात कसा रोखता येईल यावर काम करण्याऐवजी मोदी सरकार कोरोनाच्या तिसऱ्या टप्यात लढण्याची योजना आखत आहे. यावरून केंद्राकडून गांभीर्य ओळखण्यास किती उशिर झाला आहे याचा अंदाज येऊ लागला आहे. राज्यांना देण्यात येणाऱ्या पॅकेजमध्ये इमरजेन्सी रिस्पॉन्स अँन्ड हेल्थ सिस्टिम प्रिपेअरनेस पॅकेज असं नाव दिलं आहे. या पॅकेजसाठी पूर्णत: १०० टक्के निधी केंद्र सरकार देणार आहे. कोरोनाविरुद्धची लढाई मोठ्या काळापर्यंत सुरु राहणार आहे. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पाठवल्या गेलेल्या पत्राप्रमाणे हा प्रकल्प तीन टप्प्यात असणार आहे.

पहिला टप्पा जानेवारी २०२० ते जून २०२०, दुसरा टप्पा जुलै २०२० ते मार्च २०२१, तिसरा टप्पा एप्रिल २०२१ ते २०२४ अशाप्रकारे तीन टप्पे असणार आहे. पहिल्या टप्प्यात कोविड १९च्या उपचारासाठी हॉस्पिटल विकसित करणे, आयसोलेशन ब्लॉक बनवणे, व्हेंटिलेटर सुविधा असणारे आयसीयू बनवणे, पीपीई(पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट्स) एन ९५ मास्क, व्हेंटिलेटर या सुविधा उपलब्ध करणे. तसेच तपासणी केंद्र वाढवणे, त्याचसोबत निधीचा वापर महामारीविरोधात जागरुकता निर्माण करण्यासाठी केला जाईल. निधीचा एक हिस्सा रुग्णालय, सरकारी कार्यालये, जनसुविधा, रुग्णवाहिका यांना संक्रमित होण्यापासून वाचवणे यासाठी खर्च केला जाईल.

 

News English Summary: Instead of working on how to prevent the second phase of corona spreading across the country, the Modi government plans to fight the third phase of the corona. This has led to an estimate of how much the center has taken to recognize the seriousness. The emergency response and health system preparedness package has been named in the package offered to the states. The central government will provide 100 percent of the funding for this package. The war against Corona will continue for a long time. Like the letter sent to the states and the Union Territories, the project will be in three phases.

News English Title: Story Corona virus PM Narendra Modi governments three phase big plan fight against corona Crisis Covid19 News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x