17 May 2021 4:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
VIDEO | सुवेंदु अधिकारी यांनी माझ्याकडून लाच घेतली होती त्यांचं काय? मॅथ्यू सॅम्युअलचा सवाल देशात वादळ आणि कोरोना आपत्ती | त्यात अमृता फडणवीस यांचं सूचक नव्हे तर 'निरर्थक ट्विट' केंद्राने जगभरात लसी फुकट वाटल्या, त्यांच्या पापाचं फळ जनतेला भोगावं लागतंय - रुपाली चाकणकर संपूर्ण पोलीस दल कोरोना आपत्तीत लोकांसाठी कर्तव्यावर | तर राज्याचे पोलीस महासंचालक सुट्टीवर प. बंगाल | सीबीआय'च्या TMC नेत्यांवर धाडी, ममता बॅनर्जी थेट CBI कार्यालयात प. बंगालच्या राज्यपालांकडून खटला दाखल करण्याची परवानगी घेत TMC नेत्यांवर सीबीआयच्या धाडी गेल्या २४ तासांत २ लाख ८१ हजार ३८६ नवे कोरोना रुग्ण | ४,१०६ रुग्णांचा मृत्यू
x

VIDEO - तानाजी अन भाजप; खा. संभाजीराजे मोदी सरकारवर संतापले

Tanhaji Movie, PM Narendra Modi, Chhatrapati Shivaji Maharaj, BJP MP Sambhajiraje

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी तानाजी सिनेमाला वापर करण्याता आला आहे. या व्हिडीओमध्ये शिवाजी महाराजांच्या जागी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नरवीर तानाजी मालुसरे यांच्या जागी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा असलेला चेहरा दाखविण्यात आला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्रभर संताप व्यक्त केला जात आहे. यातच आता खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी ट्वीट करत या व्हिडीओबाबत नाराजी व्यक्त करत, दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराची जोरदार तयारी सुरु केली आहे. परंतु, दिल्लीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिटिकल कीडा या ट्विटर हँडलवरुन तानाजी चित्रपटातील दृष्यांना मॉर्फिंग करुन छत्रपती शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा लावण्यात आला आहे. तसेच तानाजी मालुसरे यांच्या चेहऱ्यांवर गृहमंत्री अमित शहा यांचा चेहरा लावण्यात आल्याने नवा वाद निर्माण झाला आहे.

या व्हिडीओत छत्रपती शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, नरवीर तानाजी मालुसरे यांच्या चेहऱ्यावर अमित शाह आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना उदयभान राठोड दाखवण्यात आले आहे. हा व्हिडीओ भाजपाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट केलेला नाही.

तत्पूर्वी, भारतीय जनता पक्षाचे नेते जय भगवान गोयल यांच्या ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकावरुन देशभर वादंग रंगला. महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघालं. या पुस्तकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत थेट तुलना केल्याने महाराष्ट्रात संताप व्यक्त करण्यात आला.

 

Web Title:  Morphed video of Tanhaji liken Prime Minister Narendra Modi to Chhatrapati Shivaji Maharaj MP Sambhajiraje angry tweet mentioned.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1545)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x