14 December 2024 11:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

फिट इंडिया व निरोगी भारतावर भाषण देणाऱ्यांना कुपोषण आणि बालमृत्यूबद्दल माहिती आहे?

PM Narendra Modi, Fit India Movement

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त फिट इंडिया मुव्हमेंट अभियानाची सुरुवात होत आहे. या अभियानात देशभरातील उद्योग, चित्रपट आणि क्रीडाक्षेत्रातील अनेक मान्यवर सहभागी होत आहेत. उच्च वर्गातील लोकांपुढे फिटनेस आणि निरोगी भारतावर भाषण करणाऱ्यांना खरोखर कुपोषणामुळे देशात आणि राज्यात किती बालकांचा मृत्यू होते हे ठाऊक आहे का अशी प्रश्न उपस्थित होतो आहे.

कुपोषणमुक्तीसाठी सरकारच्या सर्व यंत्रणा संयुक्तरित्या प्रयत्न करत असून आता ही समस्या नियंत्रणात आल्याचा दावा सातत्याने सरकार करत असली तरीही तो दावा खोटा असल्याचे निष्पन्न झाले आहे. जानेवारी २०१७ ते मार्च २०१९ या कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये शून्य ते ५ वर्षे वयोगटातील ३५ हजार १८७ बालमृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. यात शून्य ते एक वर्ष वयोगटातील २७ हजार ०९४ तर १ ते पाच वयोगटातील ८ हजार ०९३ मुलांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे.

एकात्मिक बाल विकास सेवा योजनेतंर्गत (आयसीडीएस) या योजनेतंर्गत शून्य ते सहा वर्षे वयोगटातील मुलांचे पोषण व आरोग्याच्या प्रश्नांवर या योजनेतंर्गत भरीव काम केले जाते. राज्याच्या आरोग्यविभागाने दिलेल्या माहितीमध्ये मागील चार वर्षामध्ये ९ हजार ६६४ मुलांचा मृत्यू कुपोषणामुळे झाला होता. यातील ७२२८ मुले वर्षभराच्या आतली तर एक ते पाच वर्ष वयोगटातील २ हजार ४३६ मुले होती. आरोग्य विभागाकडून मिळालेली माहिती ही २०१८- १९ या कालावधीपर्यंत असली तरीही या आकडेवारीचा एकत्रित विचार करता त्यामध्ये मोठा फरक दिसून येतो.

दरम्यान महाराष्ट्रात कुपोषणामुळे होणारे बालकांचा मृत्य अजून जैसे थे अशीच अवस्था आहे. सरकार बदलून सुद्धा बालमृत्यूंचा गंभीर प्रश्न अद्याप सुटलेला नाही. केवळ मागील वर्षी देखील जानेवारी ते सप्टेंबर या ९ महिन्यामध्ये महाराष्ट्रात तब्बल ११,९३२ बालमृत्यूची नोंद झाली आहे. परंतु हे प्रमाण आधीच धक्कादायक असताना त्यात कमी वजनाच्या बालकांचे सुद्धा प्रमाण वाढत असल्याची आकडेवारी समोर येते आहे.

परंतु, केवळ निवडणुकांसाठी आणि पक्ष विस्तारासाठी सत्तेत आलेलं हे सरकार या गंभीर विषयाच्या बाततीत असंवेदनशील आहे असंच वारंवार समोर आलं आहे. त्यामुळे ही गंभीर समस्या माहित असताना सुद्धा सरकारमधील जवाबदार मंत्री भलत्याच कार्यक्रमांना आणि विषयाभोवती वेळ घालवताना दिसत असतात. त्यामुळे एकप्रकारे अशा बालकांना एकप्रकारे मृत्यूच्या खाईत ढकलल्यासारखे अप्रत्यक्ष प्रकार सुरु आहेत असंच म्हणावं लागेल.

मागील वर्षी देखील जानेवारी ते सप्टेंबर या ९ महिन्यामधील उपलब्ध आकडेवारीचा विचार केला असता, सप्टेंबर २०१८ मध्ये कमी वजनाच्या बालकांचे प्रमाण वाढीस लागल्याचे दिसते. शून्य ते ५ वर्षे वयोगटातील बालकांची पोषण स्थिती अत्यंत गंभीर असल्याचे समजते. एकूण वजन घेतलेल्या मुलांचे प्रमाण ५८ लाख ७७ हजार २८१ इतके आहे, त्यानुसार साधारण श्रेणीतील ५२ लाख ३५ हजार ९९४ मुले आहेत तर मध्यम कमी वजनाच्या मुलांमध्ये ५ लाख ५२ हजार ९२४ मुलांचा समावेश आहे. तीव्र कमी वजनाच्या गटात एकूण ८८,३६३ मुले येतात. या आकडेवारीनुसार मध्यम तसेच तीव्र कमी वजनाच्या मुलांचे प्रमाण ६ लाख ४१ हजार २८७ इतके आहे.

गडचिरोली, नंदूरबार सारख्या दुर्गम भागातील कुपोषण आणि बालमृत्यूच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या खोज या संस्थेच्या बंडू साने यांनी बालमृत्यूच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहण्याची इच्छा यावेळी व्यक्त केली होती. कोर्टाकडून सुद्धा सरकारला वारंवार निर्देश दिले जातात, पण तरी सुद्धा मुलांचे मरण्याचे आणि कुपोषणाचे प्रमाण कमी होत नाही ही खेदजनक गोष्ट आहे. दरम्यान, सरकारकडून जर सक्षम आरोग्यसेवा मिळत असतील तर बालमृत्यू साहजिकच कमी व्हायला हवेत, असा मुद्दा त्यांनी बोलताना व्यक्त केला होता. यासंदर्भात राज्य महिला बालविकास विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे यांच्याशी प्रसार माध्यमांनी संपर्क साधला असता तो शक्य होऊ शकला नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x