15 December 2024 12:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon India Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, अनेक पटीने पैसा वाढवतील या फंडाच्या योजना, इथे पैशाने पैसा वाढवा Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव 900 रुपयांनी धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
x

९ महिन्यात ११, ९३२ बालमृत्यू, जवाबदार मंत्र्यांचा वेळ कुठे...सीएम चषक?

मुंबई : महाराष्ट्रात कुपोषणामुळे होणारे बालकांचा मृत्य अजून जैसे थे अशीच अवस्था आहे. सरकार बदलून सुद्धा बालमृत्यूंचा गंभीर प्रश्न अद्याप सुटलेला नाही. केवळ जानेवारी ते सप्टेंबर या ९ महिन्यामध्ये महाराष्ट्रात तब्बल ११,९३२ बालमृत्यूची नोंद झाली आहे. परंतु हे प्रमाण आधीच धक्कादायक असताना त्यात कमी वजनाच्या बालकांचे सुद्धा प्रमाण वाढत असल्याची आकडेवारी समोर येते आहे.

परंतु, केवळ निवडणुकांसाठी आणि पक्ष विस्तारासाठी सत्तेत आलेलं हे सरकार या गंभीर विषयाच्या बाततीत असंवेदनशील आहे असंच म्हणावे लागेल. त्यामुळे ही गंभीर समस्या माहित असताना सुद्धा सरकारमधील जवाबदार मंत्री भलत्याच कार्यक्रमांना आणि विषयाभोवती वेळ घालवताना दिसत आहेत. त्यामुळे एकप्रकारे अशा बालकांना एकप्रकारे मृत्यूच्या खाईत ढकलल्यासारखे अप्रत्यक्ष प्रकार सुरु आहेत असंच म्हणावं लागेल.

एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या माहितीनुसार, दगावलेली मुले शून्य ते ५ वयोगटातील आहेत. यामध्ये शून्य ते १ वर्ष वयोगटातील ९,३७९ मुलांचा, तर एक ते पाच वर्षे वयोगटातील २,५५३ मुलांचा समावेश असल्याचे आकडेवारी सांगते. दरम्यान, कुपोषित मुलांसाठी पोषण आहाराच्या योजना आखल्या जातात, तात्काळ वैद्यकीय सुविधा पुरवल्या जात असतील तर हे बालमृत्यू रोखण्यास राज्य सरकार अपयशी का ठरते, असा गंभीर प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जातो आहे.

जानेवारी ते सप्टेंबर या ९ महिन्यामधील उपलब्ध आकडेवारीचा विचार केला असता, सप्टेंबर २०१८ मध्ये कमी वजनाच्या बालकांचे प्रमाण वाढीस लागल्याचे दिसते. शून्य ते ५ वर्षे वयोगटातील बालकांची पोषण स्थिती अत्यंत गंभीर असल्याचे समजते. एकूण वजन घेतलेल्या मुलांचे प्रमाण ५८ लाख ७७ हजार २८१ इतके आहे, त्यानुसार साधारण श्रेणीतील ५२ लाख ३५ हजार ९९४ मुले आहेत तर मध्यम कमी वजनाच्या मुलांमध्ये ५ लाख ५२ हजार ९२४ मुलांचा समावेश आहे. तीव्र कमी वजनाच्या गटात एकूण ८८,३६३ मुले येतात. या आकडेवारीनुसार मध्यम तसेच तीव्र कमी वजनाच्या मुलांचे प्रमाण ६ लाख ४१ हजार २८७ इतके आहे.

गडचिरोली, नंदूरबार सारख्या दुर्गम भागातील कुपोषण आणि बालमृत्यूच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या खोज या संस्थेच्या बंडू साने यांनी बालमृत्यूच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहण्याची इच्छा यावेळी व्यक्त केली. कोर्टाकडून सुद्धा सरकारला वारंवार निर्देश दिले जातात, पण तरी सुद्धा मुलांचे मरण्याचे आणि कुपोषणाचे प्रमाण कमी होत नाही ही खेदजनक गोष्ट आहे. दरम्यान, सरकारकडून जर सक्षम आरोग्यसेवा मिळत असतील तर बालमृत्यू साहजिकच कमी व्हायला हवेत, असा मुद्दा त्यांनी बोलताना व्यक्त केला. यासंदर्भात राज्य महिला बालविकास विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे यांच्याशी प्रसार माध्यमांनी संपर्क साधला असता तो शक्य होऊ शकला नाही.

जानेवारी २०१८ ते सप्टेंबर २०१८ दरम्यान झालेल्या बालमृत्यूची माहिती

महिना — नवजात मृत्यू — बालमृत्यू – एकूण मुलांचे मृत्यू

  • जानेवारी : १११८ -३०४ – १४२२
  • फेब्रवारी : ८९७ – २६३ – ११६०
  • मार्च : ९०३ – २६१ – ११६४
  • एप्रिल : ८५९ -२५३ -१११२
  • मे : ९१८ – २२६ – ११४४
  • जून : १००५- २५६ – १२६१
  • जुलै : १०१६ – ३०४ -१३२०
  • ऑगस्ट : १३४५ – ३०१ – १६४६
  • सप्टेंबर : १३१८ – ३८५ -१७०३
  • एकूण : ९३७९ – २५५३ – ११९३२

सप्टेंबर २०१८ मधील कमी वजनाच्या बालकांचे प्रमाण

  • एकूण वजन घेतलेली मुले – ५८७७२८१
  • साधारण श्रेणी : ५२३५५९९४
  • मध्यम कमी वजनाची बालके : ५५२९२४
  • तीव्र कमी वजनाची बालके : ८८३६३
  • एकूण कमी वजनाची बालके (मध्यम तीव्र) : ६४१२८७

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)#Pankaja Munde(80)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x