21 October 2019 4:39 PM
अँप डाउनलोड

सेनेचे सर्व मंत्री बिनकामाचे असा आरोप करणाऱ्या सेना आमदाराने राज्य काँग्रेसमुक्त होऊ दिलं नाही

Congress, Shivsena, Loksabha Election 2019

चंद्रपूर : महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर आघाडीची पुरती धूळदाण झाली आहे. राष्ट्रवादीने ५ तरी जागा जिंकल्या आहेत, मात्र काँग्रेस पक्ष केवळ एका जागेवर शिल्लक राहिला आहे आणि ती जागा आहे चंद्रपूरची जिथे भाजपचे हंसराज अहिर पराभूत झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र काँग्रेसमुक्त होण्यापासून थोडक्यात वाचला आहे.

मात्र राज्य काँग्रेसमुक्त होण्यापासून वाचलं आहे ते एका शिवसेना आमदारामुळे जे सध्या भाजपचे हंसराज अहिर यांना धूळ चारूल खासदार झाले आहेत. मागील काही महिन्यापूर्वी बाळू धानोरकर शिवसेनेचे आमदार असताना पक्षाच्या मेळाव्यात अनेक मान्यवर नेते मंचावर असताना पक्षाचे मंत्री आमदारांना कोणतीही मदत करत नाहीत आणि ते आमच्यासाठी व सामान्य जनतेसाठी बिनकामाचे असल्याचा जाहीर आरोप मंचावरूनच केला होता.

तसेच शिवसेनेचे मंत्री विदर्भातील नेतेमंडळींना दुय्यम स्थान देत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला होता. दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या काही दिवस त्यांने अखेर शिवसेनेला जय महाराष्ट्र करत बाळू धानोरकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि याच लोकसभा निवडणुकीत जाईंट किलर ठरले आणि चंद्रपूरच्या खासदार हंसराज अहिर यांना माजी खासदार करत स्वतः बाळू धानोरकर चंद्रपूरचे खासदार झाले आहेत. त्यामुळे ही एकमेव जागा आहे जी काँग्रेसने राज्यात जिंकली आहे आणि त्यामुळे एका माजी शिवसैनिकानेच महाराष्ट्र काँग्रेसमुक्त होण्यापासून रोखला आहे असंच म्हणावं लागेल.

हॅशटॅग्स

#Congress(261)#Shivsena(633)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या